Employees News:- आगामी काही दिवसांमध्ये आता सणासुदीचा कालावधी सुरू होत असून दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण काही दिवसांनी येणारे असून त्या अनुषंगाने आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक दिवसापासून महागाई भत्तावाढी संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असून या सणासुदीच्या कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळेल अशी शक्यता आहे.
सध्या बेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळत असून त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे व असे झाले तर कर्मचाऱ्यांना 46% इतका महागाई भत्ता मिळेल व त्याची अंमलबजावणी ही एक जुलै 2023 पासून होणार आहे. त्यासोबतच केंद्र सरकारच्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता सोबतच बोनस मिळण्याची देखील दाट शक्यता आहे.
सदासुदीच्या कालावधीमध्ये मिळू शकतो बोनस
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांपैकी भारतीय रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये पीएलबी अर्थात उत्पादकता लिंक्ड बोनस दिला जातो. यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची 78 दिवसांची जी काही पगार असते त्या पगाराइतका बोनस मिळेल. यामध्ये गट क आणि गट ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते व बोनसची रक्कम हे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये किमान पगाराच्या आधारे ट्रान्सफर केली जाते.
परंतु यावर्षी यामध्ये वाढ करण्याची मागणी रेल्वे महासंघाच्या माध्यमातून करण्यात आली असून याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून काय घेतला जातो? हे पाहणे गरजेचे आहे. याबाबत भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून रेल्वेला पत्र देण्यात आले असून त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सातव्या वेतन आयोगाच्या आधारे ही बोनसची मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाने म्हटले आहे की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी या एक जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आल्या होत्या. परंतु अजून देखील कर्मचाऱ्यांना जो काही बोनस मिळतो तो सहाव्या वेतन आयोगाच्या गणनेच्या आधारे मिळतो. अशा परिस्थितीमध्ये त्यात बदल करून सातव्या वेतन योगाअंतर्गत तो मिळावा अशी मागणी करण्यात आलेल्या.
या कर्मचाऱ्यांना मिळेल बोनस
दरवर्षी हा बोनस केंद्र सरकारकडून सणासुदीच्या कालावधीमध्ये दिला जातो. त्याच पद्धतीने रेल्वे मंत्रालयाकडून सर्व अराजपत्रित कर्मचाऱ्यांना म्हणजेच गट सी आणि गट डी यांना पीएलबी देण्यात येतो. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या 78 दिवसाच्या पगार एवढी बोनस रक्कम दिली जाते. यामध्ये ग्रुप डी कर्मचाऱ्यांना या किमान वेतनाच्या आधारावर बोनसची गणना केली जाते.
किती मिळतो बोनस?
जर आपण सहाव्या वेतन आयोगाचा विचार केला तर यानुसार गट ड कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 7000 रुपये होते व त्यावेळी सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा तो 18 हजार रुपये करण्यात आला. यामध्ये रेल्वे कर्मचारी महासंघाच्या म्हणण्यानुसार विचार केला तर सर्व ग्रुप सी आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांचा बोनस म्हणून केवळ 17951 मिळतात.
गणना सहाव्या वेतन आयोगाच्या सात हजार रुपयांच्या किमान पगारावर आधारित आहे. त्यामुळे महासंघाची मागणी आहे की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान वेतन आधार म्हणून बोनसची रक्कम 46 हजार 159 रुपये करण्यात यावी याकरिताच रेल्वे मंत्रालयाला निवेदन देण्यात आले आहे.