EPFO Decision: पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी 15 ते 20 दिवस नाही तर लागणार फक्त 3 दिवस! ईपीएफओने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

epfo decision

EPFO Decision:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही अतिशय महत्त्वाची संघटना असून देशातील कोट्यावधी कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. तुम्हाला माहित आहे की कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये जे काही पैसे जमा होतात त्याचे नियमन करण्याचे महत्त्वपूर्ण काम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते.

कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारांमधून काही ठराविक रक्कम ही ईपीएफ अर्थात पीएफ खात्यामध्ये जमा होत असते व ही जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या कालावधीनंतर त्याला आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असते.

परंतु बऱ्याचदा काही मेडिकल इमर्जन्सी किंवा शिक्षण, लग्नकार्य किंवा घर बांधण्याकरिता अचानकपणे पैशांची गरज भासते व अशा उद्देशासाठी पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम आपल्याला काढता येऊ शकते. परंतु अशा पद्धतीचा दावा निकाली काढण्यासाठी या अगोदर पंधरा ते वीस दिवसांची वाट आपल्याला पहावी लागत होती.

परंतु आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे काही पैसे तुम्हाला काढायचे असतील तर त्या संबंधीचे दावे फक्त तीन दिवसात आता निकाली काढले जातील. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार असून याकरता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

 आगाऊ दाव्यांसाठी सुरू केली ऑटो मोड सेटलमेंट सेवा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता वैद्यकीय, शिक्षण, लग्नकार्य आणि घराचे बांधकाम किंवा खरेदी इत्यादी उद्देशांकरिता आगाऊ रक्कम हवी असेल तर अशा दाव्यांकरिता ऑटो मोड सेटलमेंट सुरू केले असून त्यामुळे आता मानवी हस्तक्षेप दूर होणार आहे व दावे निपटारा करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

या अगोदर अशा दाव्याच्या निपटाऱ्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागत होता. अशी दावे निकाली काढण्या अगोदर ईपीएफओच्या माध्यमातून संबंधित सदस्याची पात्रता तसेच महत्वाची कागदपत्रे, ईपीएफ खात्याची केवायसी स्टेटस आणि बँक खाते इत्यादी सारखा तपशील तपासला जात असे.

या अगोदरच्या या प्रक्रियेमध्ये अनेकदा अवैध दावे नाकारले जातात. परंतु आता ऑटो मोड सेटलमेंट सुरू केल्यामुळे ते दुसऱ्या स्तरावर छाननी आणि मंजुरीसाठी पाठवले जातील व जेणेकरून कोणताही दावा चुकणार नाही.

 घरबसल्या अशाप्रकारे तुम्हाला आगाऊ रकमेसाठी करता येईल दावा

1- याकरिता तुम्ही तुमचा युएएन आणि पासवर्ड वापरून ईपीएफओ पोर्टलवर लॉगिन करावे.

2- त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सेवा या पर्यायावर जाऊन क्लेम विभाग निवडावा लागेल.

3- त्यानंतर बँक खाते सत्यापित करा व प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम वर क्लिक करा.

4- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडते व त्या ठिकाणी पीएफ ऍडव्हान्स फॉर्म 31 निवडावा लागेल.

5- त्यानंतर तुम्हाला कोणत्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत ते निवडायचे आहे.

6- त्यानंतर पैसे काढण्याचे कारण व किती पैसे काढायचे आहेत हे नमूद करून त्यानंतर पत्ता भरायचा आहे.

7- ही प्रक्रिया झाल्यानंतर चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे.

8- त्यानंतर तुम्हाला तुमची संमती द्यावी लागेल आणि आधारशी पडताळणी करावी लागेल.

9- दाव्यावर प्रक्रिया केल्यानंतर तो मंजुरीसाठी नियोक्ताकडे जाईल.

10- ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून ग्राहक दाव्याची स्थिती देखील तपासू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe