EPFO New Rule:- देशातील कोट्यावधी कर्मचारी हे ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेकडून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्याचे नियमन केले जाते. कारण कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारांमधून काही योगदान ईपीएफ खात्यामध्ये जमा केले जाते.
या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांची ईपीएफओमध्ये जी काही माहिती दिलेली असते ती अचूक असणे गरजेचे आहे व ती माहिती अपडेट करणे देखील महत्त्वाचे असते. कारण बऱ्याचदा दिलेली माहिती जर अपडेट केली नाही तर चुकीच्या माहितीमुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ अडकू शकतो किंवा पैसे लागत असतील तर कर्मचाऱ्यांना पैसे मिळू शकत नाहीत.

त्यामुळे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून सदस्य आणि नियोक्ते यांचा जो काही युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात युएएन नंबर आहे त्या प्रोफाईल मधील चुका सुधारण्याकरिता जॉईंट डिक्लेरेशन यादी बदलण्यात आलेली आहे.
त्यामुळे आता तुम्हाला देखील युएएन प्रोफाईल अपडेट करायचे असेल तर तुम्हाला त्यानुसार कागदपत्रे द्यावे लागतील. एवढेच नाहीतर ईपीएफओच्या माध्यमातून 11 मार्च 2024 रोजी एसओपी सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली
व त्यानुसार अर्जदार आता वडिलांच्या/ आईच्या नावाचा आधार कार्ड तसेच पॅन कार्ड, आई- वडिलांचे नाव असलेले दहावी किंवा बारावीचे मार्कशीट आणि ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करताना सबमिट करू शकणार आहेत.
आई–वडिलांच्या नावातील चूक सुधारायची असेल तर लागतील ही कागदपत्रे
आई-वडिलांचा पासपोर्ट, रेशन कार्ड, केंद्र/ राज्य सरकारच्या माध्यमातून जारी फोटोसह मेडिक्लेम कार्ड/ पीएसयु कार्ड, पेन्शन कार्ड, महानगरपालिका किंवा इतर अधिसूचित स्थानिक स्वराज्य संस्था/ तहसीलच्या माध्यमातून जारी केलेली जन्म प्रमाणपत्र,
सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले विवाहाचे प्रमाणपत्र, केंद्र/ राज्य सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र जसे की आर्मी कॅन्टीन कार्ड किंवा जनाधार, मनरेगा जॉब कार्ड इत्यादी.
जन्मतारखेत दुरुस्ती करायची असेल तर लागतील ही कागदपत्रे
जन्माचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त सरकारी बोर्ड किंवा विद्यापीठाचे मार्कशीट, शाळेचा दाखला किंवा स्कूल ट्रान्सफर प्रमाणपत्र, केंद्र/ राज्य सरकारच्या सेवा रेकॉर्ड वर आधारित प्रमाणपत्र,
जन्मतारखेचा पुरावा नसेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, केंद्र/ राज्य शासनाची पेन्शन ऑर्डर, केंद्र/राज्य/ केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने जारी केलेले सीजीएचएस/ इसीएचएस/ मेडिक्लेम कार्ड, सरकारने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र
नाव आणि लिंग यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर लागतील ही कागदपत्रे
आधार कार्ड,पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र/ राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश सरकारने जाहीर केलेले सेवा फोटो ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट/ विद्यापीठाने जारी केलेले प्रमाणपत्र/ मार्कशीट, नाव आणि फोटो क्रॉस केलेले बँक पासबुक
वैवाहिक स्थिती अपडेट करायची असेल तर लागतील ही कागदपत्रे
सरकारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र, आधार कार्ड, घटस्फोट झाला असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे आणि पासपोर्ट