EPFO News: ‘या’ महिन्यात मिळणार पीएफवरील व्याजाचा लाभ! जाणून घ्या खात्यात किती होणार पैसे जमा?

Published on -

EPFO News:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ अर्थात पीएफ खात्यामध्ये जी काही रक्कम जमा होते त्या रकमेवर ठराविक अशा दराने व्याज दिले जाते. आपल्याला माहित आहे की जे कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आहेत त्यांचे या ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पे आणि महागाई भत्ता यांच्या 12% हिस्सा प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्यामध्ये जमा केला जातो

व तितकीच रक्कम ज्या कंपनीत कर्मचारी काम करतो त्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात जमा केले जाते. कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही 12% रकमेचे योगदान दिले जाते त्यातील 3.67% रक्कम  ईपीएफ खात्यात तर 8.33% रक्कम पेन्शन स्कीममध्ये जमा केली जाते.

अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये जे काही रक्कम जमा होत असते त्यावर व्याज दिले जाते व सध्या हे व्याज 8.25 टक्के इतके देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून या व्याजदराला मंजुरी देखील मिळाली असून प्रत्येक कर्मचाऱ्याला आता हे मंजूर व्याज खात्यावर कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे.

किती रकमेवर किती व्याज जमा होणार?

जर आपण केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या 8.25% व्याजदर अनुसार बघितले तर कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये जर एक लाख रुपये असतील तर कर्मचाऱ्यांच्या खातात 8250 रुपये जमा होतील. तीन लाख रुपये पीएफ खात्यामध्ये जर असतील तर 24500 रुपये व्याजाची रक्कम जमा होईल

व त्यासोबतच पाच लाखाची रक्कम जर पीएफ खात्यात असेल तर कर्मचाऱ्याला व्याजापोटी 41 हजार 250 रुपयांचा लाभ होईल. आर्थिक वर्ष 2023-24 साठी हा व्याजदर 8.25% टक्के करण्यात आला आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यामध्ये दहा लाखाची रक्कम जमा असेल तर 8.25 टक्के दराने 82500 चा लाभ मिळेल.

सध्या पीएफ खात्यामध्ये जमा झालेले रकमेवर जो काही 8.25% व्याजदर मिळत आहे तो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अर्थात ईपीएफओच्या सीबीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने ठरवला आहे.

 कधी मिळेल हा लाभ?

याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या म्हणण्यानुसार बघितले तर त्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बँका खात्यामध्ये हा व्याजाचा लाभ जुलै ते ऑगस्टपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जे काही व्याज जमा होण्याची प्रतीक्षा आहे ती लवकरात संपुष्टात येईल अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!