Fake Loan App: कर्ज देणाऱ्या फसव्या एप्लीकेशन पासून राहा सावध! अशा पद्धतीने ओळखा एप्लीकेशन खरे आहे की फसवणारे

Published on -

Fake Loan App:- सध्या आपण वर्तमानपत्रांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले असेल की, असल्या कर्ज देणाऱ्या ॲप्लिकेशनच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या किंवा खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडतात.

अशा फसवे कर्ज देणाऱ्या एप्लीकेशनवर आरबीआयच्या माध्यमातून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून गुगलने देखील काही हजारोंच्या संख्येमध्ये अशी अप्लिकेशन हटवली आहेत. यामध्ये बरेच एप्लीकेशन आहेत आणि ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांची गरज भागवण्यासाठी खूप उपयुक्त देखील आहेत.

परंतु यामध्ये खरे एप्लीकेशन आणि फसवेगिरी करणाऱ्या एप्लीकेशन कोणते हे आपल्याला ओळखता येणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला देखील अशा अँप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर त्या अगोदर तुम्ही त्या एप्लीकेशन बद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. काही मुद्दे विचारात घेऊन अशा अँप्लिकेशनच्या बनावटगिरी बद्दल तुम्ही ओळखू शकतात.

 या गोष्टींचा विचार करा आणि कर्ज देणारे ॲप्लिकेशन बनावट आहे की खरे हे ओळखा

1- रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून अशा कर्जाबाबत काही नियम तयार करण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला एखाद्या ॲपवरून असे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही आरबीआयच्या वेबसाईटवरून सदर ॲप हे कर्ज नियमाची पूर्तता करते की नाही हे तपासून घ्यावे.

याबाबत आरबीआय म्हणते की असे कर्ज देणारे ॲप हे बँक किंवा एनबीएफसीची नेमणूक केलेली संस्था असावी किंवा त्यांच्यापैकी एका सोबत भागीदारी असावी. या पद्धतीने सदर एप्लीकेशन कोणत्या बँकेची किंवा एनबीएफसीशी लिंक केलेले आहे हे तपासून घ्या.

2- जे कर्ज देणाऱ्या ॲप हे खरे असतात ते ग्राहकाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कर्ज देऊ शकत नाही. ग्राहकाची पडताळणी करण्यासाठी ते प्रथम केवायसी प्रक्रिया करतात. परंतु जर कर्ज देणारे ॲप फसवे असेल तर ते केवायसी प्रक्रिया करत नाही किंवा अशी सुविधा त्यांच्या अँपवर उपलब्ध होत नाही.

असे फसवेगिरी करणारे ॲप तुमची कुठलीही चौकशी न करता तुम्हाला कर्ज देण्याचा प्रयत्न करतात. असे केवायसी प्रक्रिया न करता तुम्हाला कर्ज एखाद्या ॲपच्या माध्यमातून  दिले जात असेल तर तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

3- जे कर्ज देणारे एप्लीकेशन वैध म्हणजेच खरे असतात ते तुम्हाला कर्ज देताना काही गोष्टींसाठी करार करतात. करारामध्ये प्रक्रिया शुल्क, दिलेल्या कर्जासाठी आकारण्यात येणारे व्याजदर आणि किती कालावधीत परतफेड करायची आहे

त्याचे वेळापत्रक इत्यादी गोष्टी समाविष्ट असतात. परंतु एखादे ॲप जर कर्ज देताना तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा कर्ज करार करत नसेल किंवा देत नसेल तर तुम्ही सावध होणे गरजेचे आहे.यापद्धतीने कर्ज करार न करणारे ॲप्लिकेशन बनावट असण्याची शक्यता असते.

4- बनावट कर्ज ॲप कर्ज मंजुरीकरिता अगोदरच काही पेमेंट करायला सांगतात. हे नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. जे ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप वैध असतात ते कर्ज मंजुरी पूर्वी कुठल्याही पद्धतीने पैसे देण्याची मागणी करत नाही.

5- तुम्ही प्ले स्टोअर, गुगल आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित कर्ज देणाऱ्या एप्लीकेशन बद्दल वापरकर्त्यांनी दिलेले रिव्ह्यूज तपासणे गरजेचे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन ते एप्लीकेशन बद्दल लोक काय म्हणत आहेत हे पहावे.

जर अशा रिव्ह्यूज म्हणजेच पुनरावलोकनामध्ये लोकांच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया किंवा इशारे असतील तर ते बनावट ॲप असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कर्ज घेताना ज्या एप्लीकेशन बद्दल वापरकर्त्यांचे रिव्ह्यूज चांगले आहेत अशा एप्लीकेशनच्या माध्यमातून कर्ज घेणे फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe