Fantastic Business Idea: दरमहा 50 ते 60 हजार कमवायची इच्छा आहे का? हा व्यवसाय करेल तुमची इच्छा पूर्ण! वाचा माहिती

buisness idea

Fantastic Business Idea:- नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याकारणाने अनेक तरुण आता अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करू लागले आहेत. आपल्याला यामध्ये असे बरेच तरुण दिसून येतात की उच्च शिक्षित असून देखील एखादा व्यवसाय सुरू करून चांगला पैसा मिळवताना सध्या आपल्याला दिसून येते.

यामध्ये कोणता व्यवसाय सुरू करावा आणि त्याला असलेली बाजारपेठ किंवा मागणी या महत्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात अगोदर कोणता व्यवसाय सुरू करावा हा प्रश्न आपल्या मनामध्ये कायम येतो.

जर आपण व्यवसायाची यादी पाहिली तर अनेक छोटे आणि मोठे व्यवसाय म्हणून भली मोठी यादी तयार होईल. परंतु यामधून आपल्याला फायदा होईल असा आणि चांगली बाजारपेठ उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या शोधात असतो.

याच अनुषंगाने या लेखामध्ये आपण व्यवसाय सुरू करणाऱ्यांकरिता अशी एक व्यवसायाची आयडिया आणलेली आहे जी  तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगला नफा मिळवून देण्याची क्षमता ठेवते.एवढेच नाही तर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची मदत देखील मिळते. याच व्यवसायाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 केळी अर्थात बनाना पेपर बनवण्याचा व्यवसाय

केळीची लागवड महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी केली जाते. याच केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय हा खूप फायदेशीर असा व्यवसाय आहे. केळी पेपर निर्मिती युनिट जर तुम्ही सुरू केला तर या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.

महत्वाचे म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून केळी पेपर निर्मिती युनिट संदर्भातला संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार तुम्हाला या व्यवसायासाठी लागणारे एकूण भांडवल व मिळणाऱ्या नफा यासंबंधीची संपूर्ण माहिती मिळते.

 काय असतो केळी पेपर?

केळीच्या झाडाच्या सालीचे जे काही तंतू असतात त्यापासून हा केळी पेपर म्हणजेच कागद तयार केला जातो. जर आपण केळी पासून तयार करण्यात आलेल्या कागदाचा विचार केला तर पारंपारिक कागदाच्या तुलनेमध्ये डिस्पोजेबिलिटी, घनता कमी असणे तसेच नूतनीकरण क्षमता आणि उच्चतन्यशक्ती इत्यादी गुणधर्म असतात. केळीच्या फायबरच्या सेल्युलर रचनेमुळे हे गुणधर्म त्यामध्ये येतात. त्यामुळे केळी पेपर हा उत्कृष्ट असतो.

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण किती खर्च येतो?

जर आपण या बाबतीत खादी व ग्रामोद्योग  आयोगाचा अहवाल पाहिला तर केळी पेपर उत्पादन युनिट उभारण्याकरिता एकूण 16 लाख 47 हजार रुपये खर्च येतो. परंतु तुम्हाला यामध्ये स्वतः जास्त गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही.

तुम्हाला फक्त एक लाख 65 हजार रुपये यामध्ये इन्वेस्टमेंट करावी लागते आणि उरलेली रक्कम तुम्ही  कर्जाच्या माध्यमातून उभी करू शकतात. तुम्हाला 11 लाख 93 हजार रुपयांचे मुदत कर्ज या माध्यमातून मिळते व खेळत्या भांडवला करिता दोन लाख 9 हजार रुपयांचा वित्त पुरवठा देखील तुम्हाला केला जातो.

अशा पद्धतीने तुम्ही पैशांची व्यवस्था करून केळी पेपर युनिट उभारू शकतात. तसेच या व्यवसाय करिता तुम्हाला पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून देखील कर्ज मिळते. या माध्यमातून तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी किंवा आहे त्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

 कुठला परवाना घ्यावा लागतो?

तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला एमएसएमइ उद्योग ऑनलाईन नोंदणी तसेच जीएसटी नोंदणी, बीआयएस प्रमाणपत्र आणि प्रदूषण एनओसी विभागाकडून लागते.

 या व्यवसायातून तुम्ही किती कमाई करू शकतात?

जर आपण नाही केळी पेपर व्यवसायाचा विचार केला तर या माध्यमातून तुम्ही प्रत्येक वर्षाला पाच लाख रुपये पेक्षा जास्त नफा मिळवू शकतात. पहिल्या वर्षी साधारणपणे पाच लाख रुपयांचा नफा तर दुसऱ्या वर्षी सहा लाख रुपये

आणि तिसऱ्या वर्षी सहा लाख 86 हजार रुपयांचा नफा या माध्यमातून तुम्ही मिळू शकतात. म्हणजेच जसे जसे वर्ष वाढतील व तुमची विक्री व मार्केटमधील सुधारणा होईल तसतसा तुमचा नफा वाढत जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe