Farmer Success Story: 13 हजार सागाच्या झाडांनी या शेतकऱ्याला बनवले कोट्याधीश! कसं शक्य केलं या शेतकऱ्याने?

Ajay Patil
Published:
teak farming

Farmer Success Story:- सध्या शेती आणि शेती पद्धतीत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर आणि अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड करू शेतकऱ्यांनी आता शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून करायला सुरुवात केलेली आहे व त्यासोबतच परंपरागत पिकांना फाटा देत विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत.

तंत्रज्ञानाचा वापराने शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे आता शक्य झालेले आहे. विविध प्रकारची भाजीपाला पिके व फळबागांसोबत शेतकरी आता साग तसेच महोगनी सारख्या झाडांची लागवड करून देखील खूप मोठ्या प्रमाणावर चांगले आर्थिक उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.

सागा सारख्या किंवा महोगणी सारख्या वृक्ष लागवडीचे फायदे अनेक असल्यामुळे जास्त क्षेत्र असलेले शेतकरी आता अशा प्रकारच्या झाडांच्या लागवडीतून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण मध्यप्रदेश राज्यातील एका शेतकऱ्याचा विचार केला तर त्या शेतकऱ्याने 20 एकर शेतीमध्ये केलेल्या सागवान लागवडीतून तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 सागवान लागवडीतून हा शेतकरी झाला कोट्याधीश

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश राज्यातील टिकमगड जिल्ह्यातील अनिल बडकुल या शेतकऱ्याने साधारणपणे वीस वर्षांपूर्वी मेहनत घेतली व इतर शेती पिकांसोबतच सागाची झाडे लागवड करायला सुरुवात केली. आज 20 एकर क्षेत्रामध्ये सागाची लागवड केलेली असून त्या सागाची आज किंमत शंभर कोटींपेक्षा जास्त आहे.

अनिल यांनी 20 एकर क्षेत्रामध्ये तब्बल 13000 सागाच्या झाडांची लागवड साधारणपणे 2003 ते 2013 या दहा वर्षाच्या कालावधीत केली. आता 2023 मध्ये या झाडांची किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्या ठिकाणचे हवामान साग वृक्षांसाठी अनुकूल असून त्याकरिता फारसा खर्च देखील येत नाही.

सागाची लागवड केल्यानंतर त्यांची काळजी घेणे व पाणी देणे या मुख्य गोष्टी तेवढ्या कराव्या लागतात. त्यांच्या मते सुरुवातीची तीन वर्षे खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागते व सतत त्याला पाणी द्यावे लागते. याबाबत बोलताना अनिल बडकुले यांनी म्हटले की वीस वर्षे प्रयत्न करून त्यांनी मातीत सोन निर्माण केल आहे.

 साग लागवडीची कल्पना कशी सुचली?

अनिल हे जवळपास तीस वर्षापासून शेती करत असून शेती करत असताना शेतीमधून नफा वाढला पाहिजे हा विचार त्यांच्या मनात होता. नफ्याच्या दृष्टिकोनातून शेती करताना पर्यावरणाचा देखील फायदा होणे गरजेचे असल्याचे देखील त्यांचे मत होते. या मुद्द्याला धरून त्यांनी अनेक ठिकाणहून बरीच माहिती गोळा केली व 2003 पासून साग लागवड करायला सुरुवात केली.

अगोदर त्यांनी चंदनाच्या झाडांची लागवड सुरू केली.परंतु ही शेती तोट्यात जात असल्यामुळे त्यांनी 2003 या वर्षापासून सागाची लागवड करायला सुरुवात केली. त्यांनी 20 एकर मध्ये 13000 सागाची झाडे लावली व आता त्या झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe