Farming Business Idea: एका हेक्टरमध्ये 1500 रोपे या झाडाची लावली तर चार वर्षानंतर मिळतील 3.5 लाख रुपये! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
farming business idea

Farming Business Idea:- शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतकरी करत असतात.तसेच काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार देखील प्रत्येक जणांच्या मनात असतो. शेती सोबत अनेक व्यवसाय करता येतात किंवा शेतीच्या अनुषंगानेच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे किंवा झाडांची लागवड करून देखील आपण चांगला पैसा मिळवू शकतो.

जर आपण आजकाल पाहिले तर औषध वनस्पतींचे मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड हे चांगल्या कमाईचे सध्या साधन बनले आहे. औषधी वनस्पती मधील जर आपण बोन्साय या वनस्पतीचा विचार केला तर ही एक शुभ वनस्पती मानली जाते. जर तुम्ही या रोपांची वाढ करून त्यांची विक्री केली तर चांगला पैसा या माध्यमातून मिळू शकतो. ही वनस्पती सजावटी शिवाय ज्योतिष आणि वास्तुशास्त्रासाठी देखील वापरली जाऊ शकते.

 कसा करावा बोन्साय वनस्पतीचा व्यवसाय?

यामध्ये पहिल्या पद्धतीत तुम्ही अगदी कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून घरच्या घरी हा व्यवसाय सुरू करू शकतात. या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती होण्यासाठी थोडा वेळ लागतो. कारण बोन्साय रोप तयार होण्यासाठी किमान दोन ते पाच वर्षाचा कालावधी लागतो. याव्यतिरिक्त तुम्ही रोपवाटिकेतून तयार रोपे आणून तीस ते पन्नास टक्के जास्त किमतीमध्ये तुम्ही त्यांची विक्री करू शकतात.

वीस हजार रुपये देऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.  सुरुवातीला जर तुम्ही छोट्या पातळीवर जर या व्यवसायाची सुरुवात केली तर टप्प्याटप्प्याने नफा वाढल्यानंतर तुम्ही व्यवसायात वाढ करू शकतात. बोन्साय वनस्पती हे घर आणि ऑफिसमध्ये सजावटीसाठी ठेवले जाते. दिवसेंदिवस या वनस्पतीच्या मागणीमध्ये खूप वाढ होत आहे. सद्यस्थितीला जर या रोपांची बाजारातील किंमत पाहिली तर ती किंमत दोनशे रुपयांपासून ते कमाल 2500 रुपयांच्या आसपास आहे.

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठल्या वस्तूंची आवश्यकता भासते?

हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला स्वच्छ पाणी, वालुकामाय माती किंवा वाळू, भांडी आणि काचेची भांडी, जमीन किंवा घराची टेरेस, शंभर ते दीडशे चौरस फूट एवढी जागा, स्वच्छ खडे किंवा काचेच्या गोळ्या, पातळ वायर, झाडांवर पाणी शिंपडण्याकरिता स्प्रे बाटली, शेड आणि एक जाळी आवश्यक असते.

 तीन लाखाच्या पुढे करू शकतात कमाई

समजा तुम्ही एका हेक्टर मध्ये 1500 ते 2500 रुपये लावू शकतात. तुम्ही जर तीन बाय अडीच मीटर अंतरावर जर झाडांची लागवड केली तर एका हेक्टरमध्ये 1500 झाडे लावली जातात. याव्यतिरिक्त तुम्ही दोन रोपांच्या दरम्यान जी काही जागा सोडतात त्यामध्ये तुम्ही दुसरे पीक देखील घेऊ शकतात.

या माध्यमातून तुम्हाला चार वर्षानंतर तीन ते साडेतीन लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळू लागेल. तसेच दरवर्षी तुम्हाला पुनरलागवड करण्याची गरज भासत नाही. जर तुम्ही शेताच्या चार बाय चार मीटरच्या कड्यावर जर बांबूची लागवड केली तर तुम्हाला या माध्यमातून कड्यावरती एका एकर मधून तीस हजार रुपयांचे उत्पन्न देखील मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला बोन्साय सोबत दुय्यम उत्पन्नाचे साधन देखील निर्माण होते.

 सरकारी मदत मिळते का?

तीन वर्षात प्रतिरोपाची सरासरी किंमत 240 रुपये असते. त्यापैकी प्रतिरोप 120 रुपये शासकीय मदत तुम्हाला मिळू शकते. भारतातील ईशान्यकडील भागाचा विचार केला तर या भागाशिवाय इतर ठिकाणी 50 टक्के सरकार आणि 50 टक्के शेतकऱ्यांना त्याच्या लागवडीसाठी गुंतवणूक करावी लागते.

50% सरकारी वाट्यापैकी 60 टक्के केंद्र आणि 40% राज्य सरकारचा वाटा असतो. भारताच्या ईशान्यकडील भागात सरकारला 60 टक्के आणि शेतकऱ्याला 40 टक्के गुंतवणूक करावी लागते. 60 टक्क्यांपैकी 90% केंद्र सरकारने दहा टक्के राज्य सरकार यामध्ये वाटा उचलते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe