FD Interest Rate:- नोकरी आणि व्यवसाय करत असताना पैशांची बचत केली जाते व ती गुंतवून सुरक्षित परतावा मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. याकरिता सगळ्यात जास्त मुदत ठेव या पर्यायाला प्राधान्य दिले जाते. बँका आणि पोस्ट ऑफिस,
इतर वित्तीय संस्थांमधील मुदत ठेव योजना या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि उत्तम परतावा मिळण्यासाठी विश्वासार्ह समजल्या जातात. मुदत ठेवींमधून गुंतवणूक केल्यामुळे ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर हमी उत्पन्न मिळत असते. त्याप्रमाणे बँकांच्या माध्यमातून मुदत ठेव योजना राबवल्या जातात.
अगदी त्याचप्रमाणे भारतातील अनेक नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या अर्थात एनबीएफसीमध्ये देखील मुदत ठेव करता येते. बऱ्याच एनबीएफसी ग्राहकांना मुदत ठेवीवर चांगले व्याज सध्या देत आहेत.
त्यामुळे तुम्ही देखील जर मुदत ठेवीवर चांगले व्याज मिळावे या अपेक्षेने बँकांच्या शोधात असाल तर तुम्हाला नऊ टक्क्यांपेक्षा जास्त एफडीवर व्याज देणाऱ्या तीन नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसीची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
या तीन एनबीएफसी देतील एफडीवर नऊ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज
1- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक– सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही सामान्य ग्राहकांना पाच वर्षाच्या एफडीवर 9.10% व्याज देत असून या बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना पाच वर्षाच्या कालावधीकरिता 9.60% पर्यंत व्याज देत आहे.
2- युनिटी स्मॉल फायनान्स बँक– युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही एनबीएफसी आपल्या सामान्य ग्राहकांना एक हजार एक दिवसांच्या मुदत ठेवीवर नऊ टक्के व्याज देत असून याच कालावधी करिता ज्येष्ठ नागरिकांना 9.50% दराने व्याज देत आहे.
3- फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक– फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक ही आपल्या सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या मुदत ठेवीवर 8.51% व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी म्हणजेच एक हजार दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 9.11% इतके व्याज देत आहे.