FD Rates : सणासुदीच्या काळात ‘या’ बँका FD वर देत आहेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज !

Sonali Shelar
Published:
FD Rates

Festive Season FD Rates : सणासुदीच्या काळात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एफडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. कारण काही बँका एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहेत. आज आम्ही तुच्यासाठी अशाच बँकांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

या दिवाळीत तुम्हाला FD वर अधिक व्याज मिळवायचा असेल? आणि यासाठी तुम्ही अशा बँक किंवा स्मॉल फायनान्स बँकेचा पर्याय देखील शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. एफडीमध्ये गुंतवणूक करणे ही बहुतेक लोकांची पहिली पसंती असते कारण तुमचे पैसे येथे सुरक्षित राहतात. आणि तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. येथे आम्ही अशा बँकांबद्दल सांगत आहोत ज्या सामान्य लोकांना FD वर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत.

एफडीवर जास्त व्याजदर देणाऱ्या बँका !

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 9.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के व्याज देत आहे. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

जन स्मॉल फायनान्स बँक

सध्या तुम्ही जास्त परताव्याचा शोधात असाल तर जन स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला चांगला व्याजदर ऑफर करते. बँक सामान्य लोकांना 8.10 टक्के आणि दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.80 टक्के व्याज देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांसाठी 999 दिवसांच्या FD वर 8.51 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.76 टक्के व्याज देत आहे. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला 560 दिवसांच्या FD वर 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याज देत आहे. हा देखील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 700 दिवसांच्या FD वर सर्वसामान्यांना 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe