FD Interest Rates : HDFC बँकेच्या ‘या’ विशेष FD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक, मिळत आहे भरघोस व्याज…

Ahmednagarlive24 office
Updated:
FD Interest Rates

FD Interest Rates : एचडीएफसी बँकेच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता खूप कमी वेळ शिल्लक राहिला आहे, अशातच जर तुम्ही येथे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर आपली गुंतवणूक करावी.

HDFC बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक योजना आणत असते. अशीच एक योजना म्हणजे सीनियर सिटीझन केअर एफडी. ही योजना खास ज्येष्ठ नाकरिकांचा विचार करून सुरु करण्यात आली आणि आता या योजनेत तुम्ही 10 मे पर्यंतच गुंतवणूक करू शकता. अशास्थितीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांकडे खूप कमी वेळ आहे.

HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ देते. हे तुमच्या नियमित FD पेक्षा थोडे अधिक व्याज आहे. बँक 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर मिळते. HDFC बँक सामान्य FD वर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.75 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

HDFC बँकेचे एफडीवरील व्याजदर

7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

61 दिवस ते 89 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

90 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के

9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.10 टक्के

15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

18 महिने 1 दिवस ते 21 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

21 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

2 वर्षे 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी 11 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

2 वर्षे 11 महिने ते 35 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

2 वर्षे 11 महिने 1 दिवस ते 4 वर्षे 7 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

4 वर्षे 7 महिने 1 दिवस 5 वर्षांपेक्षा कमी किंवा समान: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe