Fixed Deposit Rate: फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकांमध्ये कराल फिक्स डिपॉझिट तर मिळेल 9% व्याज

Published on -

Fixed Deposit Rate:- गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून ज्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा आणि केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते. अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते.

यामध्ये विविध बँकांच्या मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला नागरिकांच्या माध्यमातून पसंती दिली जाते. कारण बँकांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहतेच परंतु परतावा देखील चांगला मिळतो. बँकांसोबतच देशातील अनेक लहान वित्तीय बँका एफडीवर आकर्षक व्याज देतात

व यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर एफडी केली जाते. त्या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण अशा छोट्या वित्तीय बँका किंवा संस्थांची माहिती घेणार आहोत ज्या मुदत ठेवीवर चांगल्या प्रकारचे व्याज देत आहेत.

 या लहान बँका एफडीवर देतात आकर्षक व्याज

1- उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून एफडीवर 3.75 ते 8.50 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येते.

जर या बँकेमध्ये 15 महिन्यांसाठी मुदत ठेव केली तर जास्तीत जास्त व्याजाचा दर हा 8.50% आहे. त्यासोबतच पंधरा महिन्यांच्या एफडीकरिता ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर हा 9% आहे व हे दर 7 मार्च 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत.

2- नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक या बँकेच्या माध्यमातून जर नागरिकांनी 366 ते 1095 दिवसांच्या कालावधी करिता मुदत ठेव अर्थात एफडी केली तर त्यावर 7.75 टक्के व्याज मिळते व ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधी करिता 8.5% पर्यंत व्याज मिळते.

यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हा व्याजाचा दर पाच कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच या बँकेच्या माध्यमातून नियमित आणि ज्येष्ठ नागरिकांना चारशे दिवसांच्या मुदत ठेवीसाठी नेहमी ग्राहकांना 8.4% तर ज्येष्ठ नागरिकांना 9.15 टक्के व्याज मिळते.

जर 555 ते 1111  दिवसाच्या कालावधी करिता पाच कोटी रुपयांची एफडी केली तर नेहमी ग्राहकांना 8.50% टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 9.25% व्याजदर मिळतो.

3- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकरिता चार ते 9.01 टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 4.40 टक्क्यांपासून ते 9.25% पर्यंत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 25 महिन्यांच्या कालावधी करिता 9.01% आणि 9.25 टक्के जास्तीत जास्त देण्यात येत आहे. सूर्यादय स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून हे व्याजदर एक मार्च 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत.

4- शिवालिक स्मॉल फायनान्स बँक शिवालिक स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 3.50 ते 8.70 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजाचा दर चार ते 9.20 टक्क्यांपर्यंत आहे.

महिने एक दिवस ते 36 महिने मुदत ठेविवर जास्तीत जास्त व्याजदर 8.70% पर्यंत दिला जातो. या बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त व्याजदर 9.20% इतका देण्यात येतो व हे दर दोन मार्च 2024 पासून लागू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News