Fixed Deposit : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) दर दोन महिन्यांनी होणारी तीन दिवसीय बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. हे सलग तिसऱ्यांदा घडले, पॉलिसी व्याज दरांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही.
पण काही बँकांना RBI च्या या निर्णयानंतर आपल्या एफडी व्यजदारात कपात केली आहे. ज्यामुळे बरेच ग्राहक निराश झाले आहेत, अशातच तुम्हाला अशा नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीबद्दल माहिती असणे फार महत्वाचे आहे, जे मुदत ठेवींवर 8.3% पर्यंत व्याज देत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीबद्दल माहिती देणार आहोत जिथे एफडी करून गुंतवणूकदार चांगला परतावा मिळवू शकतात.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्याचा FD व्याजदर बेंचमार्क मानला जातो. इतर बँकांच्या एफडीची तुलना करताना लोक याचा संदर्भ घेतात. सध्या, SBI त्यांच्या पाच वर्षांच्या FD वर 6.5 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. तर इतर सरकारी बँकांचे एफडी व्याजदरही याच आसपास आहेत.
पण आम्ही तुम्हाला अशा एका NBFC बद्दल सांगत आहोत, जे तीन ते सहा वर्षांच्या FD वर 8.3% पर्यंत व्याजदर देत आहे. हा दर ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. सामान्य नागरिकांसाठी FD वर 8.05 टक्के व्याजदर आहे.
बजाज फायनान्स ही एनबीएफसी (Non-Banking Financial Company) आहे. पण त्याची एफडी 50,000 कोटींहून अधिक झाली आहे. हा स्वतःच एक विक्रम आहे. कंपनीच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन सिक्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने जुलै महिन्यातच गुंतवणुकीचा हा विक्रम केला आहे. या एफडीमध्ये आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी गुंतवणूक केली आहे. तुमच्या माहितीसाठी, येथे गेल्या दोन ते तीन वर्षांत ठेवी दुप्पट झाल्या आहेत. यापैकी काही आकर्षक व्याजदरांचा परिणाम होता, परंतु त्याचा मोठा भाग ग्राहकांनी बजाज ब्रँडवर ठेवलेल्या विश्वासामुळे होता.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बजाज फायनान्सचे सध्या 7.3 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. तुमच्या माहितीसाठी, यापैकी चार कोटींहून अधिक ग्राहक कंपनीच्या मोबाइल ॲपशीही जोडलेले आहेत.