Fixed Deposit Tips: अचानक पैशांच्या गरजेवेळी बँकेतली एफडी वर कर्ज घ्यावे की एफडी तोडावी? काय राहील फायद्याचे?

Published on -

Fixed Deposit Tips:- बरेचदा जीवनामध्ये घरात लग्नकार्य किंवा एखाद्या कौटुंबिक सदस्याचा जर वैद्यकीय खर्च उद्भवला तर अशावेळी अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या मार्गांनी पैशांची तजवीज करतो. यासाठी काहीजण बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारतात किंवा मित्र आणि नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेतात.

कारण अशावेळी इतका पैसा आपण स्वतः उपलब्ध करू शकू इतकी बचत प्रत्येकाचीच असते असे नाही. तसेच यामध्ये बऱ्याच जणांनी बँकेमध्ये काही रक्कम एफडी केलेली असते.

त्यावेळी बरेच जण पैशांसाठी एफडी तोडतात किंवा एफडी वर कर्ज घेतात व आर्थिक निकड भागवतात. आपण कधी विचार करतो का की एफडी तोडून पैशांची गरज भागवणे किंवा एफडी वर कर्ज घेणे यापैकी कुठला पर्याय हा तुमच्यासाठी चांगला ठरतो? तर या संबंधीची महत्त्वाची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.

 मुदत ठेव अर्थात एफडीवर कर्ज मिळते का?

 समजा तुमची बँकेमध्ये मुदत ठेव आहे व तुम्हाला आर्थिक गरज अचानकपणे उद्भवली तर तुम्ही त्या मुदत ठेवीवर कर्ज घेणे चांगले ठरते.अनेक बँकांच्या माध्यमातून एफडी वर कर्ज सुविधा दिली जाते. कारण तुम्ही जर वैयक्तिक कर्ज घेत असाल तर त्यापेक्षा हे कर्ज तुम्हाला परवडते.

यामध्ये फक्त जेव्हा तुम्ही एफडीवर कर्ज घेतात तेव्हा एफडीवर तुम्हाला जे व्याज मिळते त्यापेक्षा या कर्जावर एक ते दोन टक्के जास्त व्याज द्यावे लागते. या पर्यायांमध्ये तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो परंतु तरी देखील तुमच्या एफडीमध्ये मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे हा पर्याय उत्तम समजला जातो.

 एफडी तोडल्यावर भरावा लागेल दंड

तुम्ही पाच वर्षासाठी काही रक्कम एफडी केलेली आहे. परंतु अचानक उद्भवलेल्या आर्थिक गरजेमुळे तुम्ही त्याआधीच ती एफडी तोडली. तसेच त्या ठेवलेल्या एफडीवर तुम्हाला सात टक्के व्याज दिले जात आहे. परंतु मुदत संपण्याआधीच तुम्ही जर एफडी तोडली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

बँकांच्या माध्यमातून याकरिता शुल्क देखील आकारले जाते. त्यामुळे एफडी तोडण्याचा पर्याय तोट्याचा ठरतो. परंतु यामध्ये एफडी करून जर तुम्हाला काही महिने झाले असतील आणि आता तुम्हाला आवश्यक स्वरूपामध्ये पैशांची गरज असेल तर तुम्ही त्यावेळी एफडी तोडू शकतात.

यामध्ये देखील महत्त्वाचे असे आहे की तुमची एकूण एफडी रकमेच्या 20 ते 30 टक्के रक्कम लागत असेल तर तुम्हाला एफडी वर कर्ज घेणे अधिक फायद्याचे ठरते. परंतु जर तुम्हाला एकूण एफडीच्या जर 70 टक्के रक्कम लागत असेल तर तुम्ही एफडी तोडण्याचा निर्णय घेणे गरजेचे ठरते व तो फायद्याचा ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe