Fixed Deposits : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक ग्राहकांच्या श्रेणीत येत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर (FD) बंपर व्याज देत आहेत. त्याच वेळी, या बँका त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्यांच्या नियमित दरापेक्षा जास्त व्याज देत आहेत.
यापैकी काही स्मॉल फायनान्स बँका (SFBs) त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% पर्यंत व्याज देत आहेत. आज माही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते, तसेच तुम्हाला जास्त व्याजदर देखील ऑफर करते.
1. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत आहे.
2. युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 1001 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9.50% व्याज देत आहे.
3. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत आहे.
4. जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत आहे.
5. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9% व्याज देत आहे.
6. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७५० दिवसांच्या एफडीवर ९.११% व्याज देत आहे.
7. ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 9% व्याज देत आहे.