मोबाइल बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी ‘ह्या’ टिप्स करा फॉलो , अन्यथा आपले खाते होईल रिकामे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोना साथीच्या काळात, बहुतेक सरकारी व खासगी कर्मचारी आपले कार्यालयीन काम घरूनच करत आहेत. अशा परिस्थितीत, ते दिवसात जास्तीत जास्त वेळ इंटरनेटचा वापर करतात.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोक बँकेच्या कामकाजासाठी शाखेत जाणे देखील टाळत आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घरात बसून मोबाइल बँकिंग वापरत आहेत.

पण सध्या सायबर गुन्हेगारही याचा गैरफायदा घेत आहेत. बँकेच्या फसवणूकीचे प्रकार सतत वाढत आहेत. म्हणूनच, सुरक्षेकडे लक्ष देणे फार महत्वाचे झाले आहे. सुरक्षित मोबाइल बँकिंगसाठी काय महत्वाचे आहे ते याठिकाणी जाणून घेऊयात –

 सुरक्षित मोबाइल बँकिंगसाठी टिप्स

– आपल्या मोबाइल फोनवरील हँडसेट मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी, एक पिन किंवा पासवर्ड सेटअप करा.

– आपला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर किंवा अपडेट करा, जेणेकरुन बँकिंग ट्रांजेक्शनचे अलर्ट प्राप्त होतील. – आपल्याला खात्री नसलेल्या संदेशामधील कोणतीही URL फॉलो करू नका.

– आपणास आपला मोबाइल दुसर्‍या व्यक्तीबरोबर शेअर करावा लागला किंवा दुरुस्तीसाठी पाठवायचा असेल तर ब्राउझिंग हिस्ट्री क्लिअर करा. मेमरीमध्ये साठवलेल्या तात्पुरत्या फाइल्स क्लियर करा कारण त्यात आपला खाते क्रमांक आणि इतर संवेदनशील माहिती असू शकते. आपल्या बँकेशी संपर्क साधून मोबाइल ऐप्लीकेशन्स ब्लॉक करा. आपण आपला मोबाइल परत आला की आपण त्यांना अनब्लॉक करू शकता.

– तुमच्या मोबाईल फोनवर डेबिट / क्रेडिट नंबर, सीव्हीव्ही नंबर किंवा पिन यासारखी कोणतीही गोपनीय माहिती सेव्ह करु नका.

– आपल्या स्मार्टफोनमध्ये अँटी मालवेयर / अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल करा आणि त्यास अपडेट करत राहा.

– आपली मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आणि ऐप्लीकेशन्स लेटेस्ट सिक्योरिटी फीचर्ससह आणि अपग्रेडसह अपडेट ठेवा.

– अप्रमाणित एक्सेसपासून आपल्या मोबाइल डिव्हाइसचे संरक्षण करण्यासाठी पासवर्ड मजबूत ठेवा.

– मोबाइल बँकिंगसाठी ऑनलाइन ऑटोफिल किंवा यूजर आयडी किंवा पासवर्ड इनेबल करू नका.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment