Become Rich Tips: ‘या’ पाच गोष्टींचे पालन म्हणजेच तुमचा श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा! जाणून घ्या सविस्तर

Ajay Patil
Published:
become rich tips

Become Rich Tips:- पैसे हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले साधन असून पैशांशिवाय व्यक्तीला जीवन जगता येणे खूप कठीण असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमवावा लागतो. परंतु पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्या पैशाची बचत करून  त्या बचतीचे योग्य ठिकाणी गुंतवणूक करून पैसा वाढवणे देखील तितकेच गरजेचे असते.

कारण श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला पैसा कमवून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. कारण तुम्ही गुंतवणूक करा तरच लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकाल हे देखील वास्तव आहे. त्यासोबतच तुमच्यामध्ये आर्थिक शिस्त असणे देखील खूप गरजेचे असते.

श्रीमंत होण्यासाठी पैसा कमावण्याला जितकं महत्त्व आहे तितकं त्यासंबंधीची नियोजन उत्तम ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे. याकरिता तुम्हाला काही गोष्टी अंगी बाणवणे गरजेचे असून श्रीमंत होण्यासाठी त्या महत्त्वाच्या देखील आहेत.

 या गोष्टींचे पालन करा आणि लवकरात लवकर श्रीमंत व्हा

1- ध्येय निश्चित करणे तुम्ही एखादे नेमके असे ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. कारण तुम्ही जे ध्येय निश्चित केलेले असते ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती पैसा लागणार आहे हे कळते व त्यानुसार तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात करतात व वाचवलेला पैसा कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील देखील असतात.

जर तुम्हाला पैसे का कमवायचे आहेत यासाठीचे एखादे ध्येय तुम्ही निश्चित केले व ते किती दिवसात पूर्ण करायचे आहे? हे तुमच्या मनामध्ये परफेक्ट झाले तर तुम्ही ते त्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी नेमके नियोजन करतात किंवा तुम्हाला ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने पैसे वाचवायचे आहेत हे तुम्हाला कळतं तुम्ही व्यवस्थितरित्या पैसे वाचवून लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकतात.

2- बजेट तयार करणे खर्चाची नोंद तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर अगोदर तुमच्याकडे जो पैसा आहे तो वाचवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही कुठे किती पैशांचा खर्च करत आहात याचा हिशोब व्यवस्थित ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. घराचे भाडे, महिन्याचे वीज बिल तसेच बाहेर जेवणासाठी गेले

व त्याकरता आलेला खर्च इत्यादींचा हिशोब नीटपणे ठेवणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिन्याला तुमची कमाई किती आहे व त्या पैशांमधून किती खर्च करणे गरजेचे आहे हे ठरवून घेणे महत्त्वाचे आहे त्यानुसारच खर्च झाला पाहिजे. त्यापेक्षा जास्त खर्च होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

3- पैसे वाचवा परंतु पैशांची गुंतवणूक करा पैशांची बचत करणे किंवा पैसा वाचवणे खूप चांगले आहे. परंतु पैसा वाचवून पैसा वाढत नाही तर तुमच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये तुम्ही दीर्घ कालावधी करिता जर पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्तीचा फायदा या माध्यमातून मिळतो व तुमच्या पैशांची व्हॅल्युएशन देखील वाढते. त्यामुळे आयुष्यामध्ये जितक्या लवकरात लवकर व दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक कराल तेवढा तुमचा पैसा वाढेल.

4- गुंतवणूक करा परंतु योग्य ठिकाणी पैसे गुंतवायचे असतील तर ते योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक गरजेचे असते. या ठिकाणी तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील व तुम्हाला परतावा देखील चांगला मिळेल अशा ठिकाणी पैसे गुंतवले पाहिजेत. त्यामुळे पूर्ण अभ्यास करून किंवा गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊन पैशांची गुंतवणूक करावी.

साधारणपणे बँकांच्या मुदत ठेव योजना, गोल्ड बॉन्ड इत्यादी ठिकाणी गुंतवणूक केल्यावर पैसे बुडण्याचा धोका नसतो. परंतु परतावा मात्र कमी मिळतो. तसंच इक्विटी मार्केटमध्ये जर पैसे गुंतवले तर परतावा चांगला मिळतो परंतु पैसे बुडू शकतात हा धोका देखील असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करूनच पैसे गुंतवणूक गरजेचे आहे.

5- आपत्कालीन निधी उभारा जीवनामध्ये कधीही हॉस्पिटल किंवा इतर इमर्जन्सी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशावेळी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासू शकते. त्याकरिता अशा परिस्थितीशी आपल्याला तोंड देता येईल म्हणून आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड तयार करून ठेवणे गरजेचे आहे.

कारण जर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला या फंडामधून पैसा उभा करता येतो व  यामुळे आपण केलेल्या गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. परंतु आपल्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर मात्र आपल्याला अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये गुंतवणुकीतून पैसा काढावा लागतो व आपली गुंतवणूक कमी होते. इमर्जन्सी फंड उभारून ठेवणे खूप गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe