Pm Surya Ghar Scheme:- सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अनेक योजना राबवण्यास सुरुवात केलेली असून नुकतेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत विजेचा लाभ मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने या योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या योजनेअंतर्गत जे नागरिक रूफ ऑफ सोलर सिस्टम बसवतील त्या सर्व नागरिकांना याकरिता अनुदान देखील देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर अतिरिक्त तयार विज ही महावितरणला देखील विकून त्यातून अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकणार आहे.
किती मिळणार या योजनेतून अनुदान?
केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेतून एक किलो वॅट सोलर सिस्टम बसवणाऱ्या नागरिकांना तीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून दोन किलोवॅट सोलर सिस्टम बसवली तर साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
तसेच तीन किलोवॅट सोलर सिस्टमकरिता 78 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून किमान 30000 ते कमाल 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या पद्धतीने मिळवा तुम्ही देखील अनुदानाचा लाभ
1- याआधी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन नोंदणी करावी लागेल. या नोंदणी करिता तुम्हाला तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करून त्यानंतर तुमचा विज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल नमूद करावा लागेल.
2- दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करावे लागेल व त्या ठिकाणी असलेल्या फॉर्म नुसार तुम्हाला रूफ टॉप सोलर साठी अर्ज करावा लागेल.
3- तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्हाला फिजिबिलिटी अप्रुव्हल मिळेल तेव्हा कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून तुम्हाला प्लांट इन्स्टॉल करावा लागेल.
4- सोलर प्लांट इन्स्टॉल झाल्यानंतर त्या प्लांटचा संपूर्ण तपशील म्हणजेच माहिती तुम्हाला सबमिट करावे लागेल व नंतर नेट मीटरकरिता अर्ज करावा लागेल.
5- त्यानंतर नेट मीटर बसवले जाईल व हे मीटर बसवल्यानंतर डिस्कॉमद्वारे पडताळणी केली जाईल व त्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
6- या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट किंवा प्रमाणपत्र मिळाल्यावर पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला म्हणजेच कॅन्सल चेक सबमिट करावे लागेल व त्यानंतर तीस दिवसांच्या आत यासाठीचे अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल.
या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ
https://pmsuryaghar.gov.in हे पीएम सूर्यghr योजनेचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट आहे.