दुधाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येते गाय, म्हैस आणि शेळ्या होय. परंतु यामध्ये गाढविणीचे दूध आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असते किंवा त्या दुधाला विकत घ्यायचे म्हटले म्हणजे आपल्याला प्रति लिटरला दोन हजार रुपये द्यायला लागतात असं जर कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही.सध्या सर्दी आणि खोकला तसेच किडनीचा आजार बरा होतो असा दावा करत लातूर शहरांमध्ये एक महिला आणि पुरुष गल्लीबोळांमध्ये गाढविणीच्या दुधाची विक्री करत आहेत.
या दुधाला ग्राहकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी दिसून येत नसला तरी मात्र काही जाणकार दूध घेऊन हे लहान मुलांना देखील पाजत आहेत. याबाबतीत काही नागरिकांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या दुधात औषधी गुणधर्म असण्याला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की या दुधाला एवढा दर का आणि खरंच आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे फायदेशीर आहे का? याचा अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती घेऊ.
गाढवणीच्या दुधाबाबत महत्त्वाची माहिती
याबाबत जर आपण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या खाद्य आणि कृषी क्षेत्राशी संबंधित असलेली जी काही संघटना आहे त्या संघटनेने काही निष्कर्ष काढले असून यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बहुतांश प्राण्यांचे दूध हे गुणात्मक दृष्ट्या कमी लेखले जाते आणि यामध्ये गाढविणीच्या दुधाचा देखील समावेश होतो.
परंतु यामध्ये म्हटले आहे की ज्या लोकांना गाईच्या दुधाची एलर्जी असते त्या लोकांकरिता हे दूध खूप फायदेशीर ठरते. कारण गाढविणीच्या दुधामध्ये अशा प्रकारचे प्रोटीन असते की यामुळे या प्रकारचा लाभ मिळतो. हे दूध मानवी दुधासारखे असून यामध्ये प्रोटीन आणि चरबीचे प्रमाण कमी असते व लॅक्टोस मोठ्या प्रमाणावर असते. तसेच हे दूध लवकर नासते आणि त्यापासून पनीर वगैरे बनवता येत नाही असं देखील संघटनेने म्हटले आहे.
तसेच गाढविणीच्या दुधाचा वापर हा सौंदर्यप्रसाधने आणि औषध निर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. पेशींना ठीक करण्याची ताकद आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी देखील आवश्यक असलेले गुण गाढविणीच्या दुधात दिसून येतात. तसेच या दुधाबद्दल जर आपण काही तज्ञांचे मत पाहिले तर यामध्ये अँटी एजिंग, अँटिऑक्सिडंट आणि रिजन रेटिंग कंपाउंड असल्यामुळे त्वचा मऊ बनण्यास देखील मदत होते.
तसेच या दुधामध्ये लॅक्टॉज, विटामिन ए, बी 1, बी 2, बी 6 आणि विटामिन डी आणि विटामिन ई यांचा देखील समावेश असतो. गाढविणीच्या दुधापासून बनवलेले साबण तसेच क्रीम आणि मॉइश्चरायझरला बाजारात देखील मागणी असते. भारतीय महिलांचा विचार केला तर अनेक महिला या गाढविणेच्या दुधापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करतात. गाढविणीच्या दुधापासून बनवलेले साबण तसेच मॉइश्चरायझर आणि क्रीम सारखे उत्पादने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.