‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार वर्षाला 60 हजार रुपये रोख! काय आहे शासनाची स्वयंम योजना? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
swayam scheme

आज कालचे शिक्षण म्हटले म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे हे परवडणारे नाही अशी परिस्थिती आहे. कारण डोनेशनचा खर्च तसेच लागणारे शुल्क, वस्तीगृहासाठी लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते.

त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते.

अगदी याच पद्धतीने शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्याकरिता आणि जेवणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षाला 60000 पर्यंतचे रक्कम दिली जाणार आहे.

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वर्षाला 60 हजार रुपये पर्यंतची रक्कम

ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबवण्यात येत असून या माध्यमातून या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार रुपये पर्यंतचे रक्कम दिली जाणार आहे.

याअंतर्गत मुंबई शहर, उपनगर तसेच नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि नागपूर मध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता म्हणून वर्षाला 32000, निवासी भत्ता म्हणून वर्षाला 20000 आणि निर्वाह भत्ता म्हणून 8000 असे साठ हजार रुपये दिले जातील.

सोबतच इतर महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रांमध्ये भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास पत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये असे 51 हजार रुपये देण्यात येतील. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी भोजन भत्ता 25000, निवास भत्ता बारा हजार आणि निर्वाह भत्ता म्हणून 6000 रुपये असे एकूण 43 हजार रुपये मिळतील.

तालुक्याच्या ठिकाणी जर असे विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्यांना भोजन भत्ता म्हणून 23 हजार, निवास भत्ता म्हणून दहा हजार आणि निर्वाह भत्ता म्हणून 5000 अशी 38 हजार रुपये रक्कम मिळेल.

यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो आणि याप्रमाणे राज्यातील 21000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. 60% गुणांचं बारावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना लागू असेल. म्हणजे ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe