Gold Price Today : सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. आजही सोनं आणि चांदीच्या भावात मोठे बदल दिसून आले. अशा परिस्थितीत, तुम्ही आज सोने खरेदीसाठी बाहेर पडत असाल तर सोन्याचे दर जाणून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
भारत हा एकमेव देश आहे जिथे लोक लग्न किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा सणाच्या वेळी सोने आणि चांदी खरेदी करतात. प्राचीन काळापासून सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जाते.

मात्र, बदलत्या काळानुसार त्याचे दर वाढत आहेत. याशिवाय निर्यात शुल्क कर, मेकिंग चार्ज इत्यादींमुळे सोन्या-चांदीच्या किमती वाढत आहेत आणि कमी होत आहेत. अशा परिस्थितीत आज सोने-चांदी कुठे स्वस्त झाले आणि कुठे महाग झाले जाणून घेऊया?
प्रमुख शहरातील सोने-चांदीचा भाव !
-दिल्ली – 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने :- 58,250 रुपये; दिल्ली – 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने :- 63,530 रुपये
मुंबई – 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने :- 58,500 रुपये; मुंबई – 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने :- 63,270 रुपये
पुणे – 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने :- 58,500 रुपये; पुणे – 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने :- 63,820 रुपये
मुख्य शहरांमध्ये 1 किलो चांदीची किंमत
आज शनिवारी, जर आपण मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 75,500 रुपये आहे, तर पुणे बाजारात 78,000 रुपये अशी आहे.
सोने खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा !
कधीही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर गुणवत्तेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हॉलमार्क पाहिल्यानंतरच दागिने खरेदी करा, ही सोन्याची सरकारी हमी आहे. तुमच्या माहितीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी हॉलमार्क ठरवते. सर्व कॅरेटचे हॉल मार्क नंबर वेगवेगळे असतात, ते पाहिल्यानंतर सोने खरेदी करावे.