Gold Rate: गेल्या 2 महिन्यात तब्बल 11 हजार रुपयांनी महागले सोने! त्यामुळे आता सोने खरेदी करावे की अजून वाट पहावी? वाचा तज्ञांचे मत

Ajay Patil
Published:
gold rate

Gold Rate:- सध्या सोने व चांदीच्या दराने उच्चांकी पातळी गाठली असून कधी नव्हे एवढ्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. जर आपण  सोन्या आणि चांदीच्या दरवाढी कडे बघितले तर अवघ्या दोनच महिन्यामध्ये सोन्याचे भाव तोळ्यामागे 11000 रुपयांनी वाढले तर चांदीने देखील दोनच महिन्यात एक किलो मागे 13000 रुपयांनी वाढ होत उच्चंकी पातळी गाठली.

यामध्ये काही प्रमाणात गुंतवणूकदारांना फायदा होईल परंतु ज्या घरामध्ये लग्नकार्य आहे अशा व्यक्तींसाठी सोने-चांदीची दरवाढ डोकेदुखी ठरताना दिसून येत आहे. बरेच व्यक्ती सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात अशा लोकांना प्रश्न पडला असेल की आता सोने खरेदी करावे की अजून काही कालावधीपर्यंत वाट पाहावी? याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या भावात झालेल्या दरवाढीची आकडेवारी

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार जर आकडेवारी बघितली तर 23 फेब्रुवारी 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 62 हजार रुपयांच्या घरात होते. त्यामध्ये वाढ होत होत 16 एप्रिल 2024 रोजी सोन्याचे प्रतितोळाचे दर 73 हजार 300 रुपये होते. म्हणजेच ही आकडेवारी दाखवते की दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सोन्याच्या दरात प्रति तोळा अकरा हजार तीनशे रुपयांची वाढ झाली.

त्या खालोखाल चांदीच्या दरात देखील दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत 17 हजार रुपयांची वाढ झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईट नुसार 23 फेब्रुवारीला चांदीचा दर 69,653 रुपये प्रतिकिलो इतका होता तर 16 एप्रिल रोजी त्यामध्ये वाढ होत चांदीचा दर 86 हजार पाचशे रुपये प्रतिकिलो वर पोहोचला. म्हणजेच दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत चांदीच्या दरामध्ये देखील प्रति किलो तब्बल 16 हजार 847 रुपयांची वाढ झाली.

 सोने खरेदी करावे की वाट पाहावी? काय म्हणतात तज्ञ?

यामध्ये तज्ञांचे मत पाहिले तर अजय केडिया हे प्रसिद्ध कमोडिटी तज्ञ असून त्यामते सध्या इराण आणि इजराइल यांच्यामध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती आणि 2024 च्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे.

भविष्यात देखील सोने आणि चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम राहणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक भू राजकीय तणाव आणि काही देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी यामुळे मागणी वाढली असल्यामुळे सोने व चांदीच्या दरात वाढ होत आहे व हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

यामध्ये तज्ञ म्हणतात की एखाद्याला जर दागिने विकत घ्यायचे असतील तर त्याने ते घ्यावेत. कारण जर तुम्ही किंमत कमी होण्याची वाट पाहत आहात तर ते योग्य ठरणार नाही. सोन्याच्या दरात थोडीफार नरमाई ऑगस्ट महिन्यानंतर दिसून येईल परंतु ती देखील तात्पुरती असेल असे देखील तज्ञ म्हणतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe