Gold Rate Today:- सध्या मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर लग्नसराईचा मुहूर्त जवळपास नसतो. एवढेच नाही तर पौष महिन्यामध्ये एखादे शुभ कार्य करणे देखील योग्य मानले जात नाही. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाल्याचे सध्या दिसून येत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या भावामध्ये सतत घसरण होत असून मागील वर्षांमध्ये सोन्याच्या भावाने खूप मोठी झेप घेतल्याचे चित्र होते. परंतु काही दिवसांपासून कॉमिक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर किंमत 0.30% किंवा $6.10 च्या वाढीसह $2057.70 प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली.
तर सोन्याची जागतिक स्पॉट किमतीत देखील वाढ झालेली आहे. सगळ्या परिस्थितीत जर आपण भारतीय सराफा बाजाराचा विचार केला तर आज सोने चांदीच्या दरामध्ये थोडीशी घसरण झाल्याचे दिसून आले व त्यामुळे सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना देखील दिलासा मिळाला आहे. जर आपण गुड रिटर्न्स या वेबसाईटचा विचार केला तर आज 17 जानेवारी 2024 रोजी बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 58 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोने हे प्रति तोळा 63 हजार 330 रुपये इतके होते.
वाचा सोन्याचे दहा ग्रॅमचे आजचे भाव
आज सोन्याच्या दरामध्ये घट झालेली असून आज सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुड रिटर्न्स वेबसाईट नुसार आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,490 प्रति तोळा, 22 कॅरेट सोन्याचा दर हा 58,050 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 63 हजार तीनशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे.
चांदीच्या दरात झाली घसरण
आज सोन्या सोबतच चांदीचा भाव देखील घसरला असून बुधवारी चांदी 300 रुपये किलोने स्वस्त झाले आहे. आज मुंबईमध्ये चांदीचा दर 76 हजार 300 रुपये प्रति किलो असून मंगळवारच्या तुलनेत तब्बल पाचशे रुपये प्रतिकिलो एवढी घसरण झाली.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचा भाव
1- पुणे– पुण्याला आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा 63 हजार 330 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.
2- नाशिक– नाशिकला आज 24 कॅरेट सोन्याचा दर 63 हजार 370 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.
3- नागपूर– नागपूर शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा दर 63 हजार 330 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.
4- कोल्हापूर– कोल्हापूरला आज 24 कॅरेट सोन्याचा दर 63 हजार 330 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.