सोने-चांदीत पुन्हा घसरण ; ‘इतके’ घसरले रेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- सोने खरेदीसाठी आजचा काळ चांगला आहे, आज किंमतींमध्ये घट दिसून आली. सराफा बाजारात आज सोन्या चांदीचे भाव उदासीन आहेत.

काल म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 54 रुपयांनी घसरून 51312 रुपयांवर गेले. त्याचबरोबर चांदी 543 रुपयांनी स्वस्त झाली आणि 62720 रुपयांवर उघडली.

सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमती :-  देशाच्या एकूण बाजारपेठेवर नजर टाकल्यास इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार आज 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 51312 रुपयांवर पोचले आहेत. 23 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51017 रुपये, तर चांदीची किंमत 62720 रुपये प्रति किलो झाली. आयबीजेएने दिलेला दर सर्वत्र स्वीकारला जातो. मात्र, या संकेतस्थळावर दिलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. सोन्याची खरेदी व विक्री करताना आपण आयबीजेएच्या दराचा संदर्भ घेऊ शकता.

सोन्याचे वायदाबाजारातील भाव पडले, चांदीही खाली घसरली :-  सोन्या-चांदीच्या वायदेबाजारात किमतींमध्ये लक्षणीय घट नोंदली गेली. गुरुवारी सकाळी एमसीएक्स एक्सचेंजमध्ये डिसेंबर वायद्याच्या सोन्याचे दर 0.49 टक्क्यांनी किंवा 251 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 51,082 रुपयांवर व्यापार बंद झाला. दुसरीकडे जागतिक बाजारात सोन्याचे वायदा आणि स्पॉट किंमती या दोन्ही बाबींमध्ये लक्षणीय घट दिसून आली. देशी वायदा बाजाराच्या सोन्यासह चांदीच्या भावातही लक्षणीय घट झाली. गुरुवारी एमसीएक्स एक्सचेंजमध्ये चांदीच्या डिसेंबरच्या किमती 1.08 टक्क्यांनी घसरून 64,599 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचांदीचे भाव:-  ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींबद्दल बोलताना डिसेंबर 2020मध्ये सोन्याच्या किमती 12.60 डॉलर अर्थात 0.65 टक्क्यांनी वाढून 1,916.90 डॉलर प्रति औंस होता. त्याचवेळी स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 9.64 डॉलर म्हणजेच 0.50 टक्क्यांनी वधारला. ब्लूमबर्गच्या मते, कॉमेक्सवरील डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट चांदीची किंमत 0.30 डॉलरने वाढून 24.94 डॉलर प्रति औंस झाली. दुसरीकडे, चांदीचा भाव प्रतिऔंस 0.17 डॉलरनी वधारत 24.88 डॉलर प्रति औंस होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment