Gold Silver Price Today : आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीच्या भावात पतझड पाहायला मिळाली. सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु आहे.
त्यामुळे ग्राहकांचा कल धातूंच्या खरेदीकडे अधिक वाढला आहे. अशातच तुम्हीही लग्नासाठी किंवा कौटुंबिक समारंभासाठी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल तर त्याआधी २७ जानेवारी रोजी सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या.
आज सोन्याचा भाव 63000 तर चांदीचा भाव 76000 च्या वर गेला आहे. शनिवारी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 27 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,950 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,200 रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅम 47,410 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तसेच 1 किलो चांदीची किंमत 76500 रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत ?
आज शनिवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,950/- रुपये, पुणे बाजारात 57,800 रुपये, दिल्ली सराफा बाजारात 57,950 रुपये असा आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत?
तसेच 24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज मुंबई सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,050/- रुपये, दिल्ली मध्ये 63, 200/ रुपये तर पुण्यात 58,169असा आहे.
1 किलो चांदीची नवीन किंमत
आज शनिवारी मुंबई, दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 01 किलो चांदीची किंमत (आजचा चांदीचा दर) 75500/- रुपये आहे, तर पुण्यात 76,500 रुपये अशी आहे.