Gold-Silver Prices: सोन्यात गुंतवणूक करण्याचा हाच आहे परफेक्ट टाइमिंग! वाचा सध्याचे सोन्याचे दर आणि काय स्थिती आहे वायदे बाजारांची?

Published on -

Gold-Silver Prices:- जागतिक पातळीवर ज्याही काही महत्त्वाच्या घटना घडतात त्याचा सरळ परिणाम हा अनेक प्रकारच्या जागतिक बाजारपेठेवर होत असतो. त्याचे प्रत्यंतर आपल्याला प्रत्येकदा येताना दिसून येते. जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडाला होता तेव्हा पेट्रोल आणि डिझेल पासून ते सोयाबीन सारख्या शेतीमालाच्या बाजारभावावर देखील त्याचे परिणाम दिसायला लागले होते.

अगदी त्याच पद्धतीने जर आपण सध्या सुरू असलेल्या इसराइल आणि हमास यांच्यामध्ये जे काही युद्ध उद्भवलेले आहे त्याचे देखील परिणाम हे जागतिक बाजारपेठेवर दिसून येत आहे. या परिणामांमधून सोने चांदीची बाजारपेठ देखील अपवाद नसून या युद्धाचे ठळक परिणाम हे सोने आणि चांदीच्या दरवाढीवर दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.

जर आपण शुक्रवारचा विचार केला तर सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल तीन टक्क्यांची वाढ झाली व सात महिन्यातील उच्चांक पातळीवर पोहोचलेल्या होत्या. जेव्हाही आर्थिक मंदी व अस्थिरता उदभवते त्यावेळेस सोन्यामधील केलेली गुंतवणूक ही अतिशय सुरक्षित समजली जाते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत देखील सोन्याच्या दरामध्ये वाढ होईल अशी ही शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

 एका आठवड्यामध्ये सोन्याच्या भावात किती झाली वाढ?

शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत स्पॉट गोल्ड 2.8% वाढीसह $1921.39 प्रतिऔंस झाला. तर युएस सोन्याचे फ्युचर्स मार्केटचा विचार केला तर त्यामध्ये देखील 2.7 टक्क्यांची वाढ होऊन तो $1934.60 औंसवर पोहोचलेला होता. म्हणजे एकंदरीत ही आकडेवारी पाहिली तर सोन्याच्या किमतींमध्ये आठवडाभरात 4.8 टक्क्यांची वाढ झालेली होती. तसेच शुक्रवारी तीन टक्क्यांची वाढ होत सात महिन्यातील उच्चांक या आठवड्यामध्ये गाठला गेला.

 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात देखील सोने चमकले

जर आपण शुक्रवारी भारतातील सराफा बाजाराचा विचार केला तर सोन्याचा भाव 59 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदी 72 हजार पाचशे रुपये प्रति किलो वर होते. यामध्ये जर आपण एचडीएफसी सिक्युरिटीचा विचार केला तर त्यांच्या मतानुसार जागतिक पातळीवर जे काही सकारात्मक संकेत आहेत

त्यामुळे गुरुवारी दिल्लीत सोन्याचा भावाने 350 रुपयांची उसळी घेत तो 59 हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्राम पोहोचला तर शेवटच्या व्यवहारांमध्ये तो 58 हजार 700 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झाला. अगदी हिच परिस्थिती चांदीच्या दरात देखील दिसून आली व चांदीच्या दरात दोनशे रुपयांची वाढ होऊन चांदीचा भाव 73 हजार दोनशे रुपये प्रति किलो पर्यंत झाला.

 कसे होते सोने चांदीचे वायदे?

एचडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी हेड अनुज गुप्ता यांनी म्हटले की मासिक आधारावर सोन्याचे फ्युचर्स मध्ये 318 रुपयांनी वाढ झाली आणि हीच आकडेवारी जर टक्केवारीत पाहिली तर ती 0.55% इतकी होती. वार्षिक आधाराचा विचार केला तर यामध्ये 2901 रुपयांची वाढ नोंदवली गेली व टक्केवारी ती 5.72% होती. तसंच त्यांनी म्हटल्याप्रमाणे चांदीच्या फ्युचर्स मध्ये देखील ऑक्टोबर महिन्यात ७८३ रुपयांचे घसरन झाली व टक्केवारीत ऑक्टोबर महिन्यात ही घसरण 1.12% होती. यावर्षी चांदीच्या दरात 339 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

 येणाऱ्या दिवसात सोन्याच्या दरात राहील तेजी?

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मताचा विचार केला तर त्यांनी सांगितल्यानुसार दैनंदिन चार्ट वर सोने डिसेंबर फीचर्स उच्च उच्च आणि उच्च निचांकी पॅटर्न सेट करत असल्यामुळे हा तेजिचा कल दर्शवतो. याशिवाय मूवीज कन्वर्जन ड्रायव्हर्जन्सने सकारात्मक क्रॉसओव्हर निर्माण केला आहे व त्यामुळे बाजारात तेजी राहील अशी शक्यता आहे.

 सोन्याचे आजचे बाजार भाव

1- 22 कॅरेट सोन्याचे दर सोन्याचे 22 कॅरेटचे जर आज बाजार भाव पाहिले तर ते 55 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. त्यानुसार एक ग्रॅम 22 कॅरेट सोने हे 5510 या किमतीला मिळेल.

2- 24 कॅरेट सोन्याचे दर सोन्याच्या 24 कॅरेट चे आजचा बाजारातील दर हा 60,110 रुपये प्रति तोळा म्हणजेच प्रति दहा ग्रॅम असा असून कालपेक्षा यामध्ये 340 रुपयांची घसरण झालेली बघायला मिळाली. त्यानुसार एक ग्रॅम 24 कॅरेट सोने खरेदीसाठी आज सहा हजार अकरा रुपये मोजावे लागतील व एका ग्रॅम मागे 34 रुपये घसरण झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News