अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळी व आगामी लग्नसराईनिमित्त सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे. दसर्यानंतर सोन्याचे दर काही प्रामाणात वधारले असले तरी सध्या ते स्थिर असून दिवाळीनंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमी सोने खरेदीसाठी आताचा काळ सुवर्णकाळ मानला जात आहे. त्यामुळेच नगरमधील प्रसिध्द एस.जी.कायगांवकर ज्वेलर्सनेही खास दिवाळीनिमित्त सोने खरेदीवर एक स्मार्ट फोन बक्षिस देणारी योजना आणली आहे. दि.12 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दागिने खरेदी करणार्या भाग्यवान ग्राहकांना सोडत पध्दतीने ही भेट मिळणार आहे, अशी माहिती सुभाष कायगांवकर यांनी दिली.
ग्राहकांचा सोने खरेदीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी एस.जी.कायगांवकर दालनाने नेहीमीच खास योजना राबविल्या आहेत. कोरोनामुळे मागील सात आठ महिने सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. सोन्याचे दरही या काळात मोठ्या प्रामाणात वधारले. सध्या हे दर स्थिर असून एरिकेतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर येत्या काळात सोनं आणखी वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतात सध्या दिवाळीसारखा मोठा सण असून त्यापाठोपाठ लग्नसराईही सुरु होत आहे.
त्यामुळे आताच्या काळात सोने खरेदी महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी एस.जी.कायगांवकर ज्वेलर्सचे गंजबाजार तसेच सावेडी रोडवरील दालन सज्ज झाले आहे. करोनामुळे गंजबाजार व सावेडी रोड याठिकाणी ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वांतर्फे प्राधान्य देण्यात येत आहे. सॅनिटायझेशनची विशेष व्यवस्था आहे. सावेडी रोडवरील दालनात प्रशस्त पार्किंगची सोय असून दालनातही प्रत्येकाला निवांतपणे दागिने निवडण्यास वाव मिळतो.
सुभाष कायगांवकर यांनी सांगितले की, लग्नाच्या सुवर्णबस्त्यात नवनवीन ट्रेंड प्रचलित होत आहेत. यात कपल अंगठ्या व मंगळसूत्राच्या डिझाईनमधील व्हरायटी, फॅशन व पारंपरिक कलाकुसरीचा संगम साधणारी मोठी व्हरायटी उपलब्ध आहे. कपल अंगठ्या 5 ग्रॅमपासून पुढील वजनापर्यंत उपलब्ध आहेत. नव दाम्पत्यांकरिता खास राजऐश्वर्य वेडिंग कलेक्शनही याठिकाणी आहे.
टेंपल प्रकारातील दागिने, मॉडर्न हिरेजडीत दागिने, चपलाहार, राणीहार, शाहीहार, एस्क्लुझिव्ह डिझाईनच्या बांगड्या या दालनात आहेत. हिर्यांचा स्वतंत्र विभाग असून खात्रीशीर, दर्जेदार, क्वालिटी सर्टीफाईड हिरे व जोडीला एस.जी.कायगांवकरची विश्वनीयता येथे मिळते. याशिवाय पुजेसाठी चांदीच्या लक्ष्मी, गणपती, सरस्वती अशा देवेदवतांच्या मूर्ती, चांदीचे देव ताम्हण, दिवाळीनिमित्त द्यायच्या गिफ्टच्या असंख्य व्हरायटी, भाऊबीजेला लाडक्या बहिणीला देण्यासाठी खास अलंकार, चांदीचे गिफ्ट उपलब्ध करून देण्यात आलेत.
दिवाळीला दागिने खरेदीचे खास मुहूर्त अधिक शुभकारक व लाभकारक होण्यासाठी एस.जी.कायगांवकर ज्वेलर्स दालनातील या योजनेचा ग्राहकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन एस.जी.कायगांवकर ज्वेलर तर्फे करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved