सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला वाढणार घरभाडे भत्ता, पहा डिटेल्स

Published on -

7th Pay Commission : केंद्र शासन केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे, कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी वर्ग करणे,

फिटमेंट फॅक्टर वाढवणे याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असे म्हटले जात होते. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर कोणताच निर्णय झाला नाही.

आता मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता वाढवला जाणार आहे. जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाईल त्यावेळी घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए देखील वाढवला जाणार आहे.

सध्या महागाई भत्ता हा 46% एवढा आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2024 पासून यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे. याबाबतची घोषणा अजून झालेली नाही मात्र मार्च महिन्यात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

याचाच अर्थ जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होण्याची दाट शक्यता आहे. तथापि याची अधिकृत घोषणा मार्च महिन्यात, होळी सणाच्या आसपास केली जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

दरम्यान जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होईल तेव्हा त्यांचा घर भाडे भत्ता देखील तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

किती वाढणार HRA

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणावरून घरभाडे भत्ता दिला जात आहे. यामध्ये X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27%, Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 18 टक्के आणि Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 9 टक्के असा घर भाडे भत्ता दिला जात आहे. मात्र यामध्ये जेव्हा महागाई भत्ता 50% होईल तेव्हा आणखी तीन टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे. यानुसार, X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 30%, Y श्रेणी मधील कर्मचाऱ्यांचा 20% आणि Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा एचआरए 10 टक्के एवढा होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. निश्चितच महागाई भत्ता आणि घरबाडी भत्ता वाढला तर संबंधित नोकरदार मंडळीच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News