Google Pay Loan:- आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते व त्यावेळी आपल्याकडे आपल्या बँक खात्यात पैसा असतोच असे नाही. कधी कधी आपल्याला अगदी दहा ते वीस हजार रुपयांपर्यंतच्या रकमेची देखील निकड भासू शकते. त्यामुळे आपण मित्र किंवा नातेवाईक इत्यादी कडून हातउसने पैसे घेतो किंवा एखाद्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसीकडे कर्जासाठी अर्ज करतो.
जर तुम्हाला देखील पंधरा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ताबडतोब हवे असेल तर ते तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून देखील घेऊ शकतात. गुगल इंडियाच्या माध्यमातून भारतातील छोट्या व्यावसायिकांना मदत व्हावी या उद्देशाने गुगल पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज सुविधा सुरू केली असून त्याचेच माहिती या लेखात घेऊ.

गुगल पे वर मिळवा 15000 रुपयांचे कर्ज
गुगल इंडियाच्या माध्यमातून देशातील छोटे व्यवसायिकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने गुगल पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज देण्याची सुविधा सुरू केली असून या माध्यमातून पंधरा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज ताबडतोब मिळू शकते. एवढेच नाही तर याकरिता खूपच कमीत कमी कागदपत्रे लागणार असून ही सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला देणे गरजेचे आहे.
त्या कर्जाकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. या कर्जांना गूगल इंडियाने सॅशे लोन असे नाव दिले आहे. या माध्यमातून तुम्ही गुगल पे द्वारे कर्ज घेऊ शकतात. गुगल पे ने याकरता डीएमआय फायनान्स सोबत पार्टनरशिप केली असून यासोबतच ई-पेलेटर च्या भागीदारीत व्यापाऱ्यांकरिता क्रेडिट लाईन सक्षम करण्याची देखील सुविधा दिली आहे.
याचा वापर करून व्यापारी ऑनलाइन आणि ऑफलाईन व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करू शकतात. तसेच लोकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज देण्याकरिता गुगलने अनेक बँका आणि एनबीएफसींसोबत करार केलेला आहे. हे एक छोटे कर्ज असून यामध्ये दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. कर्जाचा कालावधी हा सात दिवस ते बारा महिन्यांचा आहे. तुम्ही हे कर्ज घेण्यासाठी ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे किंवा ऑनलाईन अर्ज देखील तुम्ही करू शकतात.
हे कर्ज कोणाला मिळू शकते?
सध्या गुगल इंडियाच्या माध्यमातून ही सुविधा टियर दोन शहरांमध्ये सुरू केली असून ज्या लोकांचे मासिक उत्पन्न 30 हजार रुपये आहे त्यांना सहजपणे हे सॅशे लोन मिळणार आहे.
कर्ज घेण्यासाठी असा करावा अर्ज
1- सर्वप्रथम तुम्हाला गुगल पे फॉर बिजनेस ॲप उघडावे लागेल.
2- यामध्ये लोन या विभागात जावे आणि ऑफर्स टॅब वर क्लिक करावे.
3- त्यानंतर तुम्हाला किती कर्ज घ्यायचे आहे ती रक्कम निवडावी लागते व गेट स्टार्ट या बटणावर क्लिक करावे.
4- या ठिकाणी क्लिक करताच तुम्हाला कर्ज देणाऱ्या भागीदाराच्या वेबसाईटवर रीडायरेक्ट अर्थात पुनर्निर्देशित केले जाईल.
5- त्यानंतर तुमच्या गुगल खात्यात लॉगिन करावे व त्या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती द्यावी. तुम्हाला कर्जाची रक्कम ठरवावी लागेल आणि कर्ज कोणत्या कालावधीसाठी घेतले जात आहे ते देखील तुम्हाला नमूद करणे गरजेचे आहे.
6- त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन करणे गरजेचे आहे व कर्जकरारावर इ स्वाक्षरी करावी लागेल.
7- त्यानंतर ईएमआय पेमेंट करता तुम्हाला सेटअप इ मॅनडेट किंवा सेटअप NACH वर क्लिक करणे गरजेचे आहे.
8- ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमचा कर्जाचा अर्ज सबमिट करावा लागेल व त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.