Government Employee News : येत्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच आपल्या राज्यातही विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
आत्तापासूनच निवडणुकीचा प्रचार, प्रसार तसेच रणनीती ठरवण्यासाठी विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान सत्तेत असलेल्यानी देखील पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे.

समाजातील सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी देखील शासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. अशातच केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन लवकरच वाढणार आहे. याबाबत एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे.
सदर मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच फिटमेंट फॅक्टर वाढीचा लाभ मिळणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पटीने फिटमेंट फॅक्टर नुसार वेतन दिल जात आहे. मात्र आता यात वाढ होणार असून 3.68 पट फिटमेंट फॅक्टर लागू होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याबाबत केंद्रीय कामगार युनियन कडून देखील पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. खरंतर या फॅक्टरमध्ये ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% क्रॉस होईल त्यावेळी वाढ होऊ शकते असे मत काही तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे. याचाच अर्थ जानेवारी 2024 पासूनच्या महागाई भत्ता वाढीपासून या फिटमेंट फॅक्टर वाढीचा लाभ मिळणार असा एक अंदाज आहे.
किती वाढणार पगार ?
यात वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा अठरा हजारावरून थेट 26 हजारावर जाणार आहे. खरंतर कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा फिटमेंट फॅक्टर वर आधारित असतो. आता यामध्ये वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांचा मूळ पगार देखील वाढणार आहे. म्हणून यात वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार तब्बल आठ हजारापर्यंत वाढेल अशी शक्यता आहे.