Fixed Deposit : कमाई करण्याची उत्तम संधी! ‘या’ बँका 365 दिवसांच्या एफडीवर देतायेत बक्कळ व्याज !

Fixed Deposit : जर एफडी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आज आपण अशा एका बँकेबद्दल जाणून घेणार आहोत जी सध्या एफडीवर सार्वधिक व्याजदर देत आहे, या बँकेत गुंतवणूक तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा कमावू शकता.

अलीकडेच, देशातील सर्वात मोठी खाजगी सावकार HDFC बँकेने त्यांच्या FD व्याजदरात वाढ केली असून, बँक आता पूर्वीपेक्षा जास्त व्याज देत आहे.

खरं तर एफडी करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने अनेक बँकांच्या व्याजदरांची तुलना केली पाहिजे. त्यानंतर, ज्या बँकेत सर्वाधिक परतावा ऑफर केला जात आहे तिथे गुंतवणूक केली पाहिजे. आज आम्ही तुमच्यासमोर जवळपास 6 बँकांच्या FD व्याजदरांची यादी घेऊन आलो आहोत. जिथे सार्वधिक परतावा दिला जात आहे.

HDFC बँक

एका वर्षाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना बँक 6.60 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्के परतावा देत आहे. 15 ते 18 महिन्यांच्या FD वर 7.10 टक्के व्याजदर आहे. 18-21 महिन्यांच्या FD वर बँक 7.25 टक्के व्याज देत आहे. बँक 21 महिने ते 2 वर्षे आणि 11 महिन्यांच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहे. 2 वर्षे 11 महिने ते 35 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के व्याजदर आहे. नवे दर 9 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

ICICI बँक

ICICI बँक एका वर्षाच्या FD वर 7.40 टक्के व्याज देते आहे. 390 दिवस ते 15 महिन्यांच्या FD वर हा परतावा 7.30 टक्के आहे. 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर वार्षिक परतावा 7.05 टक्के आहे. बँक 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहे. नवीन दर 8 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI एका वर्षाच्या FD वर 6.80 टक्के परतावा देत आहे. तर 2 ते 3 वर्षांच्या FD वर हा परतावा 7 टक्के आणि 3 ते 5 वर्षांच्या FD वर परतावा 6.75 टक्के आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर परतावा 6.5 टक्के आहे. नवीन दर 27 डिसेंबर 2023 पासून लागू आहेत.

ॲक्सिस बँक

ॲक्सिस बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एका वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के परतावा देत आहे. 2 वर्षांच्या एफडीवर परतावा 7.10 टक्के आहे. 3 वर्षांच्या एफडीवर 7.10 टक्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे. हे दर 5 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक एका वर्षाच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देते. 2 वर्षांच्या FD वर परतावा 7.15 टक्के आहे आणि 3 किंवा 4 वर्षांच्या FD वर परतावा 7 टक्के आहे. 5 वर्षांच्या FD वर परतावा 6.20 टक्के आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक 1-2 वर्षांच्या FD वर 6.85 टक्के परतावा देत आहे. 2-3 वर्षांच्या FD वर परतावा 7.25 टक्के आहे. बँक 4 वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे.