जबरदस्त ! स्मार्टफोन्स सेल ; 12000 रुपयांपर्यंत मिळतोय डिस्काउंट , वाचा सविस्तर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-अगदी स्वस्तात फोन खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आजपासून ब्लॅक फ्रायडे सेल सुरू करणार आहे. हा सेल 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात चालू राहील.

पूर्वी सणासुदीच्या मोसमात प्रचंड कमाई केल्यानंतर फ्लिपकार्ट पुन्हा एकदा सेलमध्ये स्मार्टफोन घेऊन येत आहे. या ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये सॅमसंग ते रियलमी आणि पोकोचे प्रीमियम स्मार्टफोन ऑफरमध्ये उपलब्ध आहेत.

या सेलमध्ये Realme Narzo 20, सॅमसंग गॅलेक्सी F41 आणि रिअलमी 7 आय सारख्या स्मार्टफोनवर सूट देण्यात येत आहे. तर आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप चांगली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या फ्लिपकार्ट सेलमध्ये अनेक मोबाईल डिस्काऊंटसह विक्रीसाठी उपलब्ध केले जातील.

या कार्डासह खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध असेल:-  फ्लिपकार्टने ब्लॅक फ्रायडे सेलसाठी एसबीआयशी हातमिळवणी केली आहे, म्हणजे ग्राहक जेव्हा सेल दरम्यान एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरतात तेव्हा त्यांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. म्हणून जर आपण एसबीआय खात्यासह खरेदी केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. या बातमीद्वारे तुम्हाला समजेल की ग्राहक कोणते स्वस्त स्मार्टफोन खरेदी करू शकतील.

 या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळेल

– Redmi 9i Price in India : सेल दरम्यान, Xiaomi ब्रँडचा हा स्मार्टफोन 8,299 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. हा मोबाइल फोन सध्या 9,299 रुपयांमध्ये मिळतो.

– Poco M2 Pro Price in India : फ्लिपकार्ट सेल दरम्यान हा पोको मोबाइल फोन 1000 रुपयाने स्वस्त खरेदी करता येईल. हा फोन सध्या 13,999 रुपये (एमआरपी 16,999 रुपये) मध्ये विकला जात आहे. परंतु सेलमध्ये ग्राहकांना हा फोन 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

– Poco C3 Price in India : सेल दरम्यान, पोको सी 3 स्मार्टफोनचे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकले जातील. सध्या हे मॉडेल 8999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, परंतु हा फोन सेलमध्ये 8499 रुपयात खरेदी करता येईल.

 ह्या फोनवर सर्वात जास्त डिस्काउंट

– LG G8X Price in India : एलजी ब्रँडेड हा ड्युअल स्क्रीन स्मार्टफोन सर्वाधिक डिस्काउंट देऊन विकला जाईल. फ्लिपकार्ट सेलमध्ये आपण हा एलजी मोबाइल फोन 27,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सध्या हा फोन 39,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच ग्राहकांना 12 हजार रुपयांची सूट मिळेल.

– Apple iPhone XR Price in India : आपणास Apple ब्रँडचा नवीन फोन घ्यायचा असेल तर सेलदरम्यान तुम्ही या फोनचे 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 5901 रुपयापेक्षा स्वस्त खरेदी करू शकाल. हा फोन सध्या 44,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे पण हे मॉडेल सेलमध्ये 38,999 रुपयात विकले जाईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment