HDFC Business Loan: एचडीएफसी बँकेकडून घ्या 5 लाखाचे कर्ज व करा स्वतःचा व्यवसाय सुरू! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
hdfc bank business loan

HDFC Business Loan:- सध्या नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक तरुण-तरुणी व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत.

परंतु व्यवसाय जरी सुरू करायचा म्हटला तरी देखील सगळ्यात अगोदर भांडवलाची समस्या निर्माण होते. आपल्याकडे लागणारे भांडवल पुरेशा प्रमाणात नसेल तर मात्र व्यवसाय करण्यासाठी देखील अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे बरेच व्यक्ती बँक किंवा इतर वित्तीय संस्थांचा आधार घेऊन कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करतात व व्यवसाय सुरू करतात. व्यवसायाकरिता अनेक बँकांच्या माध्यमातून देखील कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

जर तुम्ही संबंधित बँकेचे अटी व पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हाला बँकांच्या माध्यमातून देखील व्यवसायाकरिता कर्ज सुविधा मिळते. अगदी याच पद्धतीने तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून व्यवसायाकरिता पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. याच कर्जासंबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 एचडीएफसी बँक बिजनेस लोनचे वैशिष्ट्ये

एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील एक प्रसिद्ध व मोठी बँक असून बँकेच्या माध्यमातून विविध कारणांकरिता कर्ज सुविधा मिळते. यामध्ये व्यवसायाकरिता देखील कर्ज मिळते. एचडीएफसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचा विचार केला तर बँकेच्या माध्यमातून जलदरीतीने कर्ज मंजुरीचे प्रक्रिया राबविण्यात येते

तसेच ग्राहकांकरिता सुरक्षित कर्ज आणि कर्ज मंजुरीनंतर कर्जाचे पैसे ताबडतोब संबंधित ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून छोटे दुकानदार तसेच व्यावसायिक व व्यवसाय वाढ करण्याकरिता,

व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदीसाठी व स्टार्टअप  सुरू करायचा असेल व त्याकरिता जमिनीची आवश्यकता असेल तर जमीन खरेदी करण्यासाठी देखील बँकेकडून तुम्हाला कर्ज मिळते. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील बँकेच्या माध्यमातून बिझनेस लोन घेऊ शकतात.

 एचडीएफसी बिझनेस लोनच्या अटी किंवा पात्रतेचे निकष

1- अर्जदाराचे वय किमान 21 ते कमाल 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

2- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा व त्याच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्त्याच्या संबंधीचे महत्वाचे पुरावे असावेत.

3- अर्जदाराचा सिबिल स्कोर हा साडेसातशे असणे गरजेचे आहे.

4- सदर अर्जदाराचे किंवा लाभार्थ्याचे एचडीएफसी बँकेमध्ये सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंट असणे गरजेचे आहे.

5- तसेच जो व्यवसाय सुरू करणार आहात त्या संबंधीची आवश्यक कागदपत्रे देखील असणे गरजेचे आहे.

6- तसेच तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याची वार्षिक उलाढाल कमीत कमी 40 लाख रुपयांपेक्षा जास्त असावी. तसेच तीन वर्षे किंवा पाच वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

7- तसेच व्यवसायाचे कमीत कमी वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये प्रति वर्ष असावे व तुमच्याकडे आयटीआर स्लिप देखील गरजेचे आहे.

 तुमच्याकडे असावीत ही कागदपत्रे

केवायसी कागदपत्रे( यामध्ये ओळखीचा पुरावा, पत्त्याचा आणि जन्माचा पुरावा ), पॅन कार्ड तसेच सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा, व्यवसाय सुरू असल्याचा पुरावा आणि उत्पन्नाच्या गणनेसह नवीनतम आयटीआर

 कसा कराल अर्ज?

1- याकरिता तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या व्यवसायाच्या वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.

2- त्यानंतर मोबाईल नंबर वापरून साइन अप करावे. जेव्हा तुम्ही साईन अप कराल तेव्हा तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होते. या ओपन झालेल्या पेजवर मोबाईल नंबर, एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक व कर्जाची रक्कम इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करणे गरजेचे आहे.

3- नवीन पेजवर अर्जामधील योग्य माहिती व्यवस्थित भरावी तसेच अर्जासोबत जी कागदपत्रे सांगितले आहेत त्या आवश्यक ठिकाणी अपलोड करावेत.

4- तसेच अटी व शर्तीवर ई स्वाक्षरी करणे आवश्यक आहे त्याकरिता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागतो.

5- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो व तुम्ही तो नमूद करणे गरजेचे आहे.

6- ओटीपी टाकल्यानंतर आणि सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर बँक लोनच्या ऑफरची पुष्टी करणे गरजेचे आहे. याकरिता पुढे जावे व टॅप करण्याची आवश्यकता आहे.

7- त्यानंतर बँकेच्या खात्यावरील तपशील जसे की खाते क्रमांक, आयएफएससी कोड इत्यादी टाकावा.

8- हे सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही कर्जाची जी मागणी केलेली आहे त्या मंजूर कर्जाची रक्कम 24 तासाच्या आत तुमच्या खात्यात बँकेकडून जमा होते.

 एचडीएफसी बिझनेस लोनचे स्वरूप

व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून पाच लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळते व हे कर्ज तुम्हाला 11.90% व्याजदरावर मिळते. तसेच हे कर्ज परतफेडीचा कालावधी हा 12 ते 48 महिन्यांच्या मुदतीचा असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe