भारी ! Corporate FD वर मिळतेय 9% पर्यंत व्याज, जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

Published on -

Corporate FD : गुंतवणूक आणि बचतीचा विचार केला तर मुदत ठेवी (एफडी) हा गुंतवणुकीचा पर्याय भारतात खूप लोकप्रिय आहे. देशातील बहुतांश बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये मुदत ठेवीची सुविधा आहे. हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. येथे ठराविक व्याजदराने परतावा दिला जातो.

पण बाजारात बँकांव्यतिरिक्त कॉर्पोरेट एफडीही उपलब्ध आहेत. यात बँकांपेक्षा व्याज जास्त आहे.

कॉर्पोरेट एफडी म्हणजे काय?

कॉर्पोरेट एफडी कंपनीद्वारे दिली जाते. बहुतेक कॉर्पोरेट एफडी नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्यांद्वारे जारी केल्या जातात. साधारणपणे 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत लॉक इन कालावधी असतो. कॉर्पोरेट कंपन्या बाजारातून पैसे उभारण्यासाठी एफडी देत असतात. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि पारंपरिक एफडीच्या तुलनेत कंपन्या त्यांच्यावर जास्त व्याज देतात.

बेस्‍ट कॉरपोरेट एफडी

श्रीराम फायनान्स

रेटिंग: AA+/CRISIL

कालावधी : 1-5 वर्ष

व्याज : 7.60% – 8.50%

रक्कम : 5000 रुपये – 1 करोड़ रुपये

सीनियर सिटीजंस: 0.50% एक्‍स्‍ट्रा

महिला गुंतवणूकदार : 0.10% एक्‍स्‍ट्रा

बजाज फायनान्स

रेटिंग : AAA/CRISIL

कालावधी : 1-5 वर्ष

व्याज : 7.40%-8.35%

रक्कम : 15000 रुपये – 5 करोड

सीनियर सिटीजंस: 0.25% एक्‍स्‍ट्रा

महिंद्रा फायनान्स

रेटिंग: FAAA/CRISIL

कालावधी : 1-5 वर्ष

व्याज : 7.40% – 8.05%

रक्कम : 5000 रुपये – 2 करोड़ रुपये

सीनियर सिटीजंस: 0.25% एक्‍स्‍ट्रा

LIC HOUSING LIMITED

रेटिंग: FAAA/CRISIL

कालावधी : 1-5 वर्ष

व्याज : 7.25%-7.75%

रक्कम : 20000 रुपये – 2 करोड़ रुपये

सीनियर सिटीजंस: 0.25% एक्‍स्‍ट्रा

PNB HOUSING फायनान्स

रेटिंग: FAA/CRISIL

कालावधी : 1-10 वर्ष

व्याज : 7% – 7.70%

रक्कम : 10000 रुपये – 5 करोड़ रुपये

सीनियर सिटीजंस: 0.30% एक्‍स्‍ट्रा

ICICI Housing फायनान्स

रेटिंग: FAAA/CRISIL

कालावधी : 1-10 साल

व्याज : 7%-7.60%

रक्कम : 10000 रुपये – 2 करोड़ रुपये

सीनियर सिटीजंस: 0.25% एक्‍स्‍ट्रा

बँक FD पेक्षा यात जास्त धोका का आहे?

कॉर्पोरेट एफडी हे बँक एफडीपेक्षा काहीसे रिस्की असू शकते. कारण कॉर्पोरेट एफडी आरबीआयच्या सहायक कंपनी , DICGC द्वारे प्रदान केलेल्या ठेव विमा कार्यक्रमांतर्गत समाविष्ट नाहीत. बँक एफडी मध्ये मात्र गुंतवणूकदारांच्या ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आहे. म्हणजे बँक बंद झाली तरी तरी तुमचे 5 लाख रुपये सुरक्षित राहतील.

कॉरपोरेट FD साठी डॉक्‍युमेंट्स

आधार कार्ड

वोटर ID कार्ड

रेशन कार्ड

पासपोर्ट PAN कार्ड

एड्रेस प्रूफ

2 कलर पासपोर्ट साइज फोटो

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe