Home Loan:- प्रत्येकजण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा जीवन जगत असताना अनेक छोटी मोठी स्वप्न असतात. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने झटत असतो. या स्वप्नांमध्येच प्रत्येकाचे एक स्वप्न महत्त्वाचे असते व ते म्हणजे एखादे छोटे मोठे स्वतःचे घर असणे हे होय. परंतु हे स्वप्न पूर्ण करणे पाहिजे तेवढी सोपी बाब नाही.
कारण वाढत्या महागाईच्या या कालावधीत सगळ्या गोष्टींचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे घर बांधणे किंवा घर खरेदी करणे प्रचंड प्रमाणात महाग झाले आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोनचा आधार घेतात. परंतु होमलोन घेणे आणि त्याची परतफेड करणे यासाठी देखील प्रचंड प्रमाणात आर्थिक नियोजन व आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे देखील तितकेच गरजेचे असते.

परंतु आता केंद्र सरकारने होमलोनवर व्याज अनुदान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय सामान्य लोकांना घर घेण्यासाठी खूप मदत करेल हे मात्र निश्चित.
केंद्र सरकार सुरू करणार गृह कर्जावर व्याज अनुदान योजना
केंद्र सरकारने आता गृहकर्जावर व्याज अनुदान योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून तो सर्वसामान्य लोकांना घर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करेल. जर आपण सध्या शहरी भागाचा विचार केला तर या ठिकाणी घराच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने शहरी भागात घर घेण्यासाठी होमलोनचा आधार घेतला जातो. त्यामुळे आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींकरिता सरकार ही योजना सुरू करणार आहे.
महत्वाचे म्हणजे लहान शहरी गृहनिर्माण क्षेत्राकरिता स्वस्त दरामध्ये नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा यामागचा उद्देश आहे. एवढेच नाही तर यासाठी सरकार साठ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी जाहीर घोषणा याबाबत केली होती.
तेव्हा त्यांनी म्हटले होते की आम्ही येत्या काही वर्षांमध्ये एक नवीन योजना घेऊन येणार आहोत व या योजनेचा फायदा शहरांमध्ये राहणारे कुटुंबे तसेच भाड्याच्या घरात राहणारी लोक, झोपडपट्ट्या, चाळी किंवा अनधिकृतरित्या राहणाऱ्या लोकांना होणार आहे. परंतु त्यानंतर मात्र गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून या घोषणाबाबत कुठल्याही प्रकारचे अधिकृत माहिती अद्याप पर्यंत देण्यात आलेली नाही.
परंतु काही मीडिया रिपोर्टनुसार पाहिले तर या योजनेच्या माध्यमातून नऊ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज तीन टक्के ते 6.5% कमी दराने मिळेल असे सांगण्यात आले आहे व या योजनेच्या कक्षेत वीस वर्षाकरिता 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्ज आणण्याचा देखील प्रस्ताव आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार पाहिले तर पुढील काही महिन्यात बँकांच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात येणार आहे
व या व्याज सवलतीचा लाभ लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात आधीच जमा केला जाणार आहे. या योजनेचा प्रस्ताव 2018 करिता सादर करण्यात आला असून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. ही योजना लागू झाल्यामुळे शहरी भागातील कमी उत्पन्न असलेल्या 25 लाख लोकांना फायदा होईल.