FD In SBI:- बँकांमधील मुदत ठेव हा एक गुंतवणुकीतून मिळणारा उत्तम परतावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फायद्याचा पर्याय समजला जातो. प्रत्येक बँकेच्या मुदत ठेव योजना असून यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देखील मुदत योजना असून सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया मुदत योजनेच्या माध्यमातून चांगला व्याजदराचा लाभ गुंतवणूकदारांना देत आहे.
जर तुम्हाला देखील तुमची पैसे बँकेच्या एफडी स्कीममध्ये गुंतवायचा असेल तर एसबीआय बँक एफडी स्कीम फायद्याची ठरू शकते. या अनुषंगाने या लेखामध्ये जर तुम्ही एसबीआय एफडी स्कीममध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर बँकेकडून तुम्हाला किती वर्षात किती नफा मिळतो याबद्दलचे कॅल्क्युलेटर आपण या लेखात बघणार आहोत.
एसबीआय एफडीमध्ये 1 वर्षाकरिता 1 लाख रुपये गुंतवल्यास किती परतावा मिळेल?
समजा तुम्ही स्टेट बँकेच्या एफडी स्कीम मध्ये एक वर्षाच्या मुदतीच्या एफडी स्कीम मध्ये एक लाख रुपये गुंतवले तर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कालावधीनुसार व्याजदराचा लाभ दिला जातो. एक वर्षाच्या एफडीमध्ये बँक ग्राहकांना गुंतवणूक नंतर 6.8% दराने व्याजाचा लाभ सध्या देत असून ज्येष्ठ नागरिकांना 7.3% दराने व्याज दर दिला जात आहे.
समजा तुम्ही एका वर्षाकरिता एक लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला एका वर्षात व्याजापोटी 6,975 रुपये मिळतात. म्हणजेच व्याज आणि मुद्दल मिळून एका वर्षाच्या एफडीवर एक लाख 6,975 रुपयाचा परतावा मिळतो व जेष्ठ नागरिकांना एक लाख 7502 रुपयाचा परतावा मिळतो.
दोन वर्षांकरिता एक लाख रुपयांच्या एफडीवर किती मिळतील पैसे?
एसबीआयच्या मुदत ठेव योजनेमध्ये जर तुम्ही दोन वर्षाच्या कालावधीकरिता एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर बँक तुम्हाला सात टक्के व्याजदर देत आहे व ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदराचा लाभ दिला जात आहे.
त्यानुसार दोन वर्ष कालावधी करिता गुंतवलेल्या एक लाख रुपयांवर एक लाख 14 हजार 888 रुपयांचा परतावा मिळतो. म्हणजेच व्याज म्हणून तुम्हाला 14888 रुपये मिळतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांना एक लाख 16 हजार 22 रुपये मिळतात.
एसबीआय एफडी स्कीममध्ये 5 वर्षाकरिता 1 लाख रुपये गुंतवणुकीवर किती मिळेल पैसा?
जर कोणत्याही ग्राहकांनी एसबीआयच्या मुदत ठेव योजनेमध्ये पाच वर्षाच्या कालावधी करिता एक लाख रुपये गुंतवले तर त्याला 6.5% दराने व्याजाचा लाभ मिळत आहे ज्येष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याज दिले जात आहे. यानुसार पाच वर्षाच्या कालावधी करिता जर एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मुदतपूर्तीच्या वेळी बँक तुम्हाला एक लाख 38 हजार 42 रुपयाचा परतावा देते.
म्हणजेच 38 हजार 42 रुपये तुम्हाला व्याज मिळते. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जर पाच वर्षाकरिता एक लाख रुपये गुंतवले तर त्यांना एक लाख 44 हजार 995 रुपये परतावा मिळतो. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 44 हजार 995 रुपये व्याज दिले जाते.