ICICI Bank Fraud : भारत जितक्या वेगाने डिजिटलकडे वाटचाल करत आहे, तितक्याच वेगाने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. अशा स्थितीत बऱ्याच ग्राहकांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागते. अशातच देशातील सर्वात मोठी खाजगी बँक ICICI ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ग्राहकांना एक संदेश दिला आहे. जेणेकरून ग्राहक अशा फसवणुकीला बळी पडू नयेत, आणि त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणींना समोरे जाऊ लागू नये.
याबाबतीत बँकेकडून सातत्याने पत्र पाठवले जात आहेत. कारण, आजकाल ICICI बँकेच्या नावाने लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. ज्याला अनेक ग्राहक बळी पडत आहेत. अशास्थितीत बँकेकडे हजारो तक्रारी येऊ लागल्या आहेत, म्हणूनच बँकेने एक नोटीस जारी केली आहे.

बँकेने ट्विट करत ही माहिती दिली
बँकेकडून सांगण्यात आले आहे की, ‘आयसीआयसीआयच्या ग्राहकांनी अशा कोणत्याही फोन कॉलवर त्यांचे तपशील देऊ नयेत ज्यामध्ये क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची चर्चा आहे. तुमचा OTP, पासवर्ड किंवा CVV यासह कोणतीही माहिती देऊ नका. बँकेकडून ग्राहकांना असा कोणताही कॉल केला जात नाही. जर तुम्ही माहिती शेअर केली तर तुमचे बँकेत ठेवलेले पैसे चोरीला जाऊ शकतात.’

ICICI च्या नावाने फसवणूक
आजकाल ICICI च्या नावाने कॉल जवळपास सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. लोक त्यांची क्रेडिट कार्ड मर्यादा तपासण्यासाठी त्यांचे सर्व तपशील शेअर करत आहेत. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीकडे ग्राहकाचे नाव आणि नंबर आधीपासूनच असतो, ज्यामुळे लोकांना विश्वास ठेवणे सोपे जाते.
सायबर गुन्ह्याची तक्रार कशी करावी
जर तुम्हाला कोणत्याही सायबर गुन्ह्याची तक्रार करायची असेल तर तुम्ही cybercrime.gov.in वर तक्रार करू शकता. याशिवाय तुम्ही 1930 हेल्पलाइनवर कॉल करून माहिती देऊ शकता. तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जितके जागरूक असाल तितके तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित असतील.













