IDBI Bank Personal Loan:- जीवनामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर अनेकदा आपल्याला अचानकपणे पैशांची आवश्यकता भासते व प्रत्येक वेळी आपल्या खिशात किंवा बँक खात्यात आवश्यक असणारा पैसा नसतो. त्यामुळे आपण बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनकरिता अर्ज करतो व पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण सध्या जास्त आहे.
याशिवाय घरामध्ये लग्नकार्य किंवा नवीन घर बांधणे, घराचे नूतनीकरण इत्यादी कामांसाठी देखील पर्सनल लोन प्रामुख्याने घेतले जाते. भारतातील प्रत्येक बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनची सुविधा ग्राहकांसाठी दिली जाते. या बँकांमधून जर आपण आयडीबीआय अर्थात इंडियन डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया बँकेचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून देखील तुम्ही पर्सनल लोन साठी अर्ज करू शकतात.

ही एक भारतीय औद्योगिक विकास बँक असून अवघ्या काही मिनिटात तुम्हाला पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जाची सुविधा या बँकेच्या माध्यमातून देण्यात येते. जर तुमचा सिबिल स्कोर उत्तम असेल तर तुम्ही आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळवू शकतात. जर तुम्हाला देखील आयडीबीआय पर्सनल लोनकरीता अर्ज करायचा असेल तर या संबंधीचे संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊ.
आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेण्याचे फायदे
1- आयडीबीआय बँक कर्जदारांना आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब कर्जाची सुविधा प्रदान करते.
2- या कर्ज सुविधा अंतर्गत नागरिकांना 25 हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते.
3- हे कर्ज नागरिकांना एक वर्ष ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये परतफेड करता येते.
4- ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे असे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व ताबडतोब कर्ज मिळू शकतात.
5- आयडीबीआय बँक पर्सनल लोनकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा करिता तारण देण्याची आवश्यकता नाही.
6- आयडीबीआय बँककडून तुम्ही जे काही कर्ज घ्याल त्यावर तुम्हाला प्रति वर्ष 11% ते 15.50% पर्यंत व्याजदर लागतो.
7- आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून तुम्हाला प्री पेमेंट किंवा टॉप अप कर्जाची सुविधा देखील दिली जाते.
आयडीबीआय बँक कर्ज घेण्यासाठी पात्रता
1- स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती, पगारदार कर्मचारी किंवा उत्पन्नाचा नियमित स्त्रोत असलेले अर्जदार आयडीबीआय कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात.
2- सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
3- अर्जदाराचे महिन्याचे उत्पन्न कमीत कमी 15000 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
4- आयडीबीआय पर्सनल लोनकरिता अर्ज करताना पगारदार व्यक्ती असली तर अशा व्यक्तींकरिता किंवा एक ते दोन वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे व त्यासोबतच स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींकरिता किमान तीन वर्षाचा सतत व्यवसायाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचा सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
आयडीबीआय बँक पर्सनल लोन करिता लागणारे कागदपत्रे?
आयडीबीआय बँक पर्सनल लोन करिता अर्जदाराचे आधार कार्ड, ओळखपत्र( वोटर आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ), मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, दोन वर्षासाठी आयटीआर, फॉर्म क्रमांक 16 किंवा आयटीआर, कर्मचारी ओळखपत्र आणि रोजगार प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराचे फोटो
घरी बसून कसा कराल अर्ज?
1- याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.
2- या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वेबसाईटचे होमपेज ओपन होते.
3- येथे तुम्हाला पर्सनल लोन हा पर्याय मिळेल व या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
4- या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला पर्सनल दोन विषयी सर्व माहिती दिसेल व ही माहिती संपूर्णपणे वाचून Apply Now वर क्लिक करावे लागेल.
5- यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फार्म उघडतो.
6- येथे जर तुम्ही आयडीबीआय बँकेचे खातेदार असाल तर होय हा पर्याय निवडा आणि तुमचा ग्राहक आयडी किंवा खाते क्रमांक मोबाईलवर टाका व मिळालेला ओटीपी नमूद करा.
7- त्यानंतर तुम्हाला कर्जाच्या फॉर्मसाठी प्रोसिड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
8- जर तुम्ही बँकेचे ग्राहक नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा व तुमचा फॉर्म पुढे जा.
9- या फार्मवर प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि नोकरीशी संबंधित सर्व माहिती फॉर्ममध्ये योग्यरीत्या भरणे गरजेचे आहे आणि त्यानंतर सबमिट करा या पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे.
10- फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून बँकेच्या शाखेत कागदपत्रांसह येण्यासाठी कॉल येईल.
11- त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व ते जर योग्य असतील तर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल.
12- कर्ज मंजूर झाल्यानंतर 24 तासांच्या आत कर्जाचे रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
अशाप्रकारे तुम्ही अगदी साध्या पद्धतीने घरी बसून आयडीबीआय बँक पर्सनल लोन करिता अर्ज करू शकता.