शहरात नाहीतर गावातच थांबा व ‘हे’ व्यवसाय करून प्रचंड पैसा कमवा! गावातच राहून कमवू शकाल 30 ते 40 हजार रुपये प्रतिमहिना

ग्रामीण भागामध्ये देखील अनेक प्रकारचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने चालू शकतात व बरेचशे व्यवसाय हे कमीत कमी खर्चात देखील आपल्याला सुरू करता येऊ शकतात व यातून आपण महिन्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळवू शकतो.

business idea

Rural Business Idea:- आजकाल जर आपण परिस्थिती बघितली तर रोजगारासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हे स्थलांतर प्रामुख्याने नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने होते. परंतु गावाकडे किंवा ग्रामीण भागाचा जर आपण बारकाईने विचार केला तर या ठिकाणी देखील अनेक प्रकारच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते.

परंतु या संधी नोकरीच्या नसून व्यवसायाच्या असतात. ग्रामीण भागामध्ये देखील अनेक प्रकारचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने चालू शकतात व बरेचशे व्यवसाय हे कमीत कमी खर्चात देखील आपल्याला सुरू करता येऊ शकतात व यातून आपण महिन्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळवू शकतो.

त्यामुळे तूम्हाला देखील नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने शहराकडे जायचे असेल तर असे न करता तुम्ही गावातच थांबून या लेखात दिलेल्या व्यवसायांपैकी कुठलाही एक व्यवसाय जरी सुरू केला तरी तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो.

गावात थांबून हे व्यवसाय करा आणि चांगला पैसा मिळवा

1- आधुनिक पिठाची गिरणी- पिठाची गिरणी हा व्यवसाय खूप महत्त्वाचा असून जग कितीही प्रगत झाले व रेडिमेड पीठ वापरत असले. तरी देखील आजही ग्रामीण भागामध्ये गिरणीवर दळून आणलेल्या धान्यापासूनचे पीठ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

यामध्ये आपल्याला माहित आहे की गहू असो किंवा ज्वारी तसेच बाजरी इत्यादी धान्य दळून त्या पिठापासून बनवलेल्या चपात्या किंवा भाकरी खाण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे आधुनिक पिठाची गिरणी जर तुम्ही उभारली तर या माध्यमातून चांगला पैसा तुम्ही मिळवू शकता.

2- डेअरी व्यवसाय उभारा- सध्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चालणारा व्यवसाय जर कोणता असेल तर तो डेअरी व्यवसाय आहे. डेरी व्यवसायामध्ये आपल्याला स्पर्धा दिसून येते. परंतु गुणवत्ता टिकवून जर तुम्ही व्यवसाय केला तर कितीही स्पर्धा असली तरी देखील तुम्ही मोठ्या प्रमाणावर या व्यवसायात ग्राहक जोडू शकतात.

तसेच इतर दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील डेरी व्यवसायाचा फायदा होतो. डेरी व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही दुधाचेच नाहीतर दुधापासून बनवलेले अनेक पदार्थांची देखील विक्री करू शकतात व स्वतःचे उत्पादन बनवून स्वतःचा दुग्ध ब्रँड देखील विकसित करू शकतात.

3- रेडीमेड कपड्यांचा किंवा इतर कपड्यांचा व्यवसाय- ग्रामीण भागामध्ये सध्या हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर चालत असून याला खूप चांगले दिवस आहेत. शहरी भागातच नाही तर आता ग्रामीण भागामध्ये देखील फॅशनचा ट्रेंड वाढत असल्याने फॅशनेबल रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागात उभारू शकतात.

याकरिता तुम्ही गावातील चांगली जागा निवडून आणि आजकालचा तरुणाईचा ट्रेंड ओळखून जर रेडीमेड कपड्याचा व्यवसाय सुरू केला तर या माध्यमातून चांगला आर्थिक नफा तुम्ही मिळवू शकतात व इतकेच नाही तर या व्यवसायात तुम्ही एक स्वतःचा ब्रँड देखील निर्माण करून उत्तम पद्धतीने मार्केटमध्ये नाव बनवू शकतात.

4- रिटेल स्टोअर- रिटेल स्टोरचे आकर्षण आता ग्रामीण भागामध्ये देखील वाढतांना दिसून येत आहे. हा व्यवसाय करायचा असेल व तुमचे गाव जर मोठे असेल तर या ठिकाणी आधुनिक रिटेल स्टोअर सुरू करू शकतात व या माध्यमातून वेगवेगळे ब्रँडचे उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. थोडेसे भांडवल टाकून जर तुम्ही रिटेल सामानाचे दुकान सुरू केले तर हा एक चांगला व्यवसाय तुमच्याकरिता सिद्ध होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe