महिलांना केलेल्या बचतीतून मिळवायचा जास्त पैसा तर ‘या’ योजना ठरतील गेमचेंजर! गुंतवणुकीतून मिळेल भरघोस व्याज आणि पैसे राहतील सुरक्षित

महिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आजकाल ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग यामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या ठिकाणी कामे करतात व छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची बचत करत असतात. परंतु महिलांनी केलेली बचत बऱ्याचदा आपल्याला घरातील एखाद्या डब्यामध्ये साठवलेली जास्त करून ग्रामीण भागामध्ये तरी दिसून येते.

Ajay Patil
Published:
scheme for women

Investment Scheme For Women:- पैशांची बचत आणि त्या बचतीची केलेली गुंतवणूक ही भविष्यासाठी खूप महत्त्वाची असते व ही गुंतवणूक अनेक अर्थांनी आपल्याला फायदेशीर ठरू शकते. जसे की पुढे चालून मुलांचे उच्च शिक्षण तसेच लग्नकार्य किंवा इतर अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येत असतात अशावेळी चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेला पैसा हा कामी येत असतो व आर्थिक दृष्टिकोनातून माणूस स्वावलंबी राहत असतो व त्याला कधीही कुणापुढे हात पसरवण्याची वेळ येत नाही.

अगदी महिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आजकाल ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग यामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या ठिकाणी कामे करतात व छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची बचत करत असतात. परंतु महिलांनी केलेली बचत बऱ्याचदा आपल्याला घरातील एखाद्या डब्यामध्ये साठवलेली जास्त करून ग्रामीण भागामध्ये तरी दिसून येते.

परंतु असे न करता महिलांनी जर काही योजनांमध्ये ही बचत गुंतवली तर त्यांना कालातराने खूप चांगला मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे या लेखात आपण अशा काही महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसच्या योजनांची माहिती घेऊ ज्यामध्ये महिला त्यांची बचत गुंतवू शकतात व कालांतराने चांगले व्याजासह उत्तम परतावा मिळवू शकतात.

महिलांसाठी गुंतवणुकीकरिता उत्तम ठरतील या योजना

1- पोस्ट ऑफिसची एमआयएस अर्थात मासिक इन्कम स्कीम- महिलांसाठी पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम ही बेस्ट अशी योजना आहे. महिलांना जर या योजनेमध्ये खाते उघडून गुंतवणूक सुरू करायचे असेल तर अगदी हजार रुपयांची देखील गुंतवणूक या योजनेत महिला करू शकतात.

तसेच गुंतवणुकीवर मिळणारा जर व्याजदर पाहिला तर यामध्ये 7.4% इतका व्याजदर मिळत असल्याने केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा महिलांना मिळू शकतो. नियमित उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

2- महिला सन्मान बचतपत्र योजना- महिला सन्मान बचत पत्र योजना देखील महिलांसाठी उपयुक्त असून महिलांनी जर या योजनेत गुंतवणूक केली तर खूप उत्तम पद्धतीचा परतावा या योजनेतून मिळू शकतो व पैसा देखील सुरक्षित राहू शकतो. कुठल्याही वयाची महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते.

तुम्हाला जर जास्तीत जास्त गुंतवणूक करायची असेल तर एका वेळी दोन लाख रुपये या योजनेत जमा करता येऊ शकतात व केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.5% व्याजदराने सध्या व्याज मिळत आहे.

समजा तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू केली व सुरू करायला एक वर्ष झाले आहे व तुम्हाला पैशांची अडचण भासली तर तुम्ही 40% रक्कम या खात्यातून काढू शकता.

3- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना- पोस्ट ऑफिसची ही योजना महिलांसाठीच नाही तर सर्व गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर अशी योजना आहे. अगदी शंभर रुपयापासून तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकतात. या योजनेचा परिपक्वता कालावधी म्हणजेच मॅच्युरिटी पिरेड हा पाच वर्षाचा आहे.

या योजनेच्या नियमामध्ये एक ऑक्टोबर पासून काही बदल करण्यात आलेले आहेत. परंतु ३० सप्टेंबर 2024 पर्यंत जमा रकमेवर 7.5% इतके व्याज मिळत आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्याआधी व्यवस्थित माहिती करून घेणे गरजेचे आहे.

4- पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना- पोस्ट ऑफिसची फायदेशीर योजनांपैकी ही एक खूप महत्त्वाची अशी गुंतवणूक योजना आहे व ज्या कुणाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. महिला वर्गासाठी देखील ही योजना उत्तम असून कमीत कमी पाचशे रुपये पासून या योजनेत गुंतवणूक करता येते व सध्या या योजनेत गुंतवणुकीवर 7.1% इतका व्याजदर मिळत आहे.

महिला वर्ग असो किंवा कोणीही गुंतवणूकदार असो ज्यांना दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक करायची असेल त्यांच्याकरिता ही योजना खूप फायदेशीर, सुरक्षित आणि लाभदायक आहे. या योजनेमध्ये जर पैसे गुंतवले तर महिला त्यांचे भविष्य हे आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित करू शकतात व पैशांच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe