Share Market Portfolio : टॉप कंपन्यांचे शेअर्सच्या शोधात असाल तर सरकारी कंपन्यांचे ‘हे’ टॉप शेअर्स गुंतवणुकीसाठी ठरतील फायद्याचे! वाचा माहिती

Published on -

Share Market Portfolio :-  जागतिक पातळीवरील महागाई हे सध्या चिंतेचे कारण असले परंतु तरीदेखील देशातील आणि बाह्य मागणीतील स्थिर वाढ ही कंपन्यांसाठी आगामी सहामाही सकारात्मक राहणार असल्याचे सुचित करत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारामध्ये अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत. हे शेअर्स येणाऱ्या कालावधीत चांगला परतावा देऊ शकतील असा एक अंदाज आहे. त्यामुळे या लेखांमध्ये आपण काही महत्त्वाच्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला चांगल्या परताव्याच्या अपेक्षा आहे व गुंतवणूक सुरक्षित राहावी या इच्छेने जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या सरकारी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकतात.

या आहेत टॉप सरकारी कंपन्या

1- रेल्वे विकास निगम- सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 154.25 रुपये आहे. या कंपनीच्या मागच्या एक वर्षाचा परतावा पाहिला तर तो 294% आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही कंपनी देखील फायद्याचे ठरू शकते.

2- एनबीसीसी लिमिटेड- या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 138.35 रुपये इतकी आहे. मागच्या वर्षी या कंपनीच्या शेअर्सने एक वर्षाचा परतावा हा 104% दिला होता.

3- इंजिनीयर्स इंडिया लिमिटेड- सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 125.25 रुपये आहे. मागील एक एक वर्षाचा परतावा ऐंशी टक्के दिला होता.

4- एनएलसी इंडिया लिमिटेड- सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 141.30 रुपये आहे. मागील एक वर्षाचा परतावा 78 टक्के मिळाला होता.

5- एनएमडीसी लिमिटेड- या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 159.75 रुपये आहे. मागील वर्षी या कंपनीचे एक वर्षाचा परतावा 54% दिला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News