एसआयपीत गुंतवणूक करून होता येते करोडपती! 20 वर्ष 5 हजाराची गुंतवणूक बनवते तुम्हाला करोडपती,परंतु करावे लागेल हे काम

invetsment plan

गुंतवणुकीच्या उपलब्ध पर्यायांपैकी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपी हा एक उत्तम पर्याय असून यामध्ये तुम्ही दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक केली तर काही वर्षांनी तुम्ही करोडपती होऊ शकतात. फक्त यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करताना त्यात सातत्य ठेवणे खूप गरजेचे असते.

म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये तुम्ही महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकतात व साधारणपणे एसआयपीत केलेल्या गुंतवणुकीवर सरासरी 12% रिटर्न मिळतो. एसआयपीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला चक्रवाढीचा लाभ देखील दिला जातो.

सध्याच्या महागाई वाढीच्या तुलनेमध्ये जर एसआयपीतील गुंतवणुकीचा विचार केला तर ही एक महागाईवर मात करण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्याच्या निवृत्तीच्या कालावधीमध्ये आर्थिक समृद्धी रहावी याकरिता एसआयपीत गुंतवणूक सुरू करायची असेल

तर तुम्ही त्यामध्ये दहा टक्क्यांचा टॉपअप ठेवणे गरजेचे आहे. जर यामध्ये तुम्ही दहा टक्क्यांचा टॉप-अप लागू करून गुंतवणूक सुरू ठेवली तर वीस वर्षाच्या एसआयपी मध्ये तुम्ही जमा झालेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळवू शकतात.

 पाच हजार रुपयांची नियमितपणे एसआयपी वीस वर्षे केली तर किती पैसा मिळेल?

समजा तुम्ही पाच हजार रुपयांची नियमित मासिक गुंतवणूक वीस वर्षांसाठी करणे सुरू ठेवले तर तुम्ही त्यामध्ये बारा लाख रुपयांची गुंतवणूक करतात. यामध्ये तुम्ही 12 टक्क्यांचा रिटर्न पकडला तर त्यानुसार तुम्हाला 37 लाख 95 हजार 740 रुपये व्याज मिळते. म्हणजेच तुम्हाला वीस वर्षांमध्ये तुमची जमा रक्कम आणि मिळणारे व्याज असे मिळून एकूण 49 लाख 95 हजार 740 रुपये मिळतात.

 या गुंतवणुकीला दरवर्षी 10 टक्क्यांनी टॉप अप दिला तर काय फायदा होईल?

तुम्ही पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ती प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी वाढवली तर तुम्ही वीस वर्षांमध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. टॉप अप एसआयपी म्हणजे तुम्ही जी काही रक्कम नियमितपणे जमा करतात तिला आणखी काही रक्कम जोडून गुंतवणूक करणे होय.

तुम्हाला टॉप अपचे गणित समजून घ्यायचे असेल तर या उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. समजा तुम्ही एका वर्षाकरिता दोन हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ते वर्ष संपल्यानंतर त्या दोन हजार रुपयांच्या गुंतवणुकीला 10 टक्क्यांचा टॉप-अप जोडला  म्हणजेच 2000 चे 10% म्हणजेच दोनशे रुपयांची वाढ तुम्हाला त्यामध्ये करावी लागेल

व पुढील वर्षापासून 2200 रुपये गुंतवणे गरजेचे आहे. त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही 2220 दहा टक्के टॉप अप म्हणजे 222 रुपये वाढवून ही एसआयपी 242 रुपयांची केली. अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक वर्षी तुम्हाला एसआयपी ची वार्षिक रक्कम दहा टक्क्यांनी वाढवणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे जर तुम्ही गुंतवणूक करत गेलात आणि वार्षिक 10% टॉप-अप जोडून गुंतवणूक केली तर वीस वर्षांत तुम्ही एकूण 34 लाख 36 हजार पाचशे रुपये गुंतवणूक करतात व त्यावर 65 लाख 7 हजार 858 रुपये व्याज तुम्हाला मिळते व तुम्ही वीस वर्षांमध्ये 99 लाख 44 हजार 358 रुपये म्हणजेच जवळपास एक कोटी रुपये जमा करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe