कांद्याचा व्यवसाय ‘अशा पद्धती’ने केला तर महिन्याला कमवाल 50 ते 60 हजार! जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

शेतीसंबंधी व्यवसायांची यादी खूप मोठी असून या क्षेत्राशी निगडित असलेला कुठला जरी व्यवसाय केला तरी त्यामध्ये चांगल्या प्रकारे पैसा आपल्याला मिळवता येतो. यामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो आणि त्यासोबतच काही छोट्या-मोठ्या व्यवसायांचा देखील आपल्याला समावेश यामध्ये करता येतो.

Ajay Patil
Published:
onion business

Onion Wholesale Selling Business:- शेतीसंबंधी व्यवसायांची यादी खूप मोठी असून या क्षेत्राशी निगडित असलेला कुठला जरी व्यवसाय केला तरी त्यामध्ये चांगल्या प्रकारे पैसा आपल्याला मिळवता येतो. यामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो आणि त्यासोबतच काही छोट्या-मोठ्या व्यवसायांचा देखील आपल्याला समावेश यामध्ये करता येतो.

शेती क्षेत्राशी संबंधित व्यवसायांच्या यादीमध्ये जर आपण बघितले तर कांद्याच्या संबंधित व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पैसा देऊ शकतो. म्हणजेच कांद्याचा होलसेल व्यवसाय हा आपल्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो व अगदी कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात.

सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर कांद्याचा होलसेल व्यवसाय तुम्ही सुरू केला तर यातून चांगल्या प्रकारे आर्थिक समृद्धी मिळवता येणे शक्य आहे. त्यामुळे या व्यवसायातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या लेखात जाणून घेऊ.

कांद्याचा होलसेल व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करावा?
जर कांद्याचा होलसेल विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही कांदा कोणत्या ठिकाणाहून खरेदी करणार आणि विकणार कुठे हे सगळ्यात अगोदर लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच कांदा हा नाशवंत असल्यामुळे जास्त प्रमाणात खरेदी केला तर त्याची साठवण तुम्ही कशा पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणी करणार म्हणजे ज्यासाठी तुम्ही एखादे दुकान किंवा चाळ किंवा गोदाम इत्यादी ठिकाणी साठवणूक करणार या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते.

त्यामुळे तुम्हाला जर कांद्याचा होलसेल विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अगोदर तुमच्या जवळच्या बाजारपेठेचे ठिकाण पाहणे खूप गरजेचे आहे. आपल्याला माहित आहे की बऱ्याच कार्यक्रमांमध्ये देखील कांद्याचा वापर केला जातो व प्रामुख्याने लग्नासारख्या समारंभामध्ये कांद्याचा वापर जास्त होतो.

त्या अनुषंगाने तुम्ही जर कार्यक्रमाचे आयोजन करणारी जे काही व्यक्ती किंवा स्वयंपाकी/केटरर्स यांच्याशी संपर्क ठेवून देखील तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे तुम्ही चालवू शकतात.

हा व्यवसाय साधारणपणे दोन प्रकारे आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजेच जर तुम्ही शेतकरी असाल तर स्वतःच्या शेतात कांद्याचे उत्पादन घेऊन तो विक्री करू शकतात आणि दुसरा प्रकार म्हणजे घाऊक कांद्याचा व्यवसाय होय.

या प्रकारामध्ये तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून कांद्याची खरेदी करू शकतात व छोट्या दुकानदारांना होलसेल मध्ये तो विकू शकतात.

बाजारपेठेचा अभ्यास ठरेल महत्त्वाचा
तुम्हाला जर कांद्याचा होलसेल विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बाजाराचे संशोधन खूप गरजेचे आहे. यामध्ये जागेची निवड तसेच तुमच्या आजूबाजूला किती लोकसंख्या राहते इत्यादी गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दिवसाची सुरुवात करावी आणि तुमच्या दुकानापासून किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही कांदा विक्री करणार आहात

त्या ठिकाणापासून कांदा खरेदीचे ठिकाण किती अंतरावर आहे हे देखील यामध्ये महत्त्वाचे ठरते. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कांदा खरेदी केला तर तो तुम्हाला मोकळा म्हणजेच सुट्टा मिळतो आणि हा कांदा विकत घेतल्यानंतर तुम्हाला तो गोण्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅगेत व्यवस्थित वजन करून पॅक करणे देखील गरजेचे असते.

तुम्ही जर कांद्याची पॅकिंग एकदम आकर्षक आणि चांगल्या पद्धतीने केली तर विक्रीवर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. कांद्याच्या विक्रीकरिता तुम्ही गोण्यांचा वापर करू शकता आणि गोण्या व्यवस्थित सीलबंद करून त्यांची विक्री करू शकतात.

किती मजुरांची लागेल आवश्यकता?
तुम्हाला जर कांद्याचा होलसेल विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तो एकटे सुरू करू शकत नाही. कारण यामध्ये बऱ्याच प्रकारचे कामे करायला मजूर लागतात. जसे की तुम्हाला खरेदी केलेला कांद्याचे स्वच्छता करणे तसेच त्याची शॉर्टिंग करणे इत्यादी कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते.

तसेच विक्रीकरिता जेव्हा तुम्ही कांदा न्याल तेव्हा तो वाहनांमध्ये चढवण्याकरिता आणि उतरवण्यासाठी देखील मजूर लागतात. त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मजुरांची निवड करू शकतात.

कांद्याचा होलसेल विक्रीच्या व्यवसायासाठी परवाना लागतो का?
तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणीची गरज भासत नाही. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की जर तुमच्या व्यवसायाचा वर्षाचा टर्नओव्हर 25 लाखांपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जीएसटीमध्ये नोंदणी करणे गरजेचे असते.

किती करावी लागेल गुंतवणूक आणि किती मिळेल नफा?
या व्यवसायाची गुंतवणूक बघितली तर तुम्हाला वाहन व्यतिरिक्त एक ते दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. वाहनाची खरेदी पकडून गुंतवणुकीत वाढ होते. या व्यवसायाचा नफा जर बघितला तर कुठल्याही व्यवसायाप्रमाणे या व्यवसायात देखील तुम्हाला थोडेसे जास्त कष्ट सुरुवातीला करावे लागतात.

परंतु एकदा व्यवसाय चांगला रन झाला तर त्यानंतर तुम्ही या माध्यमातून चांगला नफा मिळवू शकतात. अगदी सुरुवातीला जरी बघितले तरी तुम्ही महिन्याकाठी पन्नास ते साठ हजार रुपये नफा यात मिळवू शकतात व कालांतराने टप्प्याटप्प्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe