एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असेल तर पूर्णपणे मोफत मिळतात ‘या’ सेवा! जाणून घ्या आणि मिळवा फायदे

खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये कोणताही व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीचे कुठल्यातरी बँकेमध्ये सॅलरी अकाउंट म्हणजे पगार खाते असते. पगार खात्याच्या बाबतीत बघितले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात व प्रत्येक बँकेच्या माध्यमातून हे नियम पगार खात्यासाठी लागू होत असतात.

Ajay Patil
Published:
salary account

Benefit Of Salary Account In SBI:- खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये कोणताही व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीचे कुठल्यातरी बँकेमध्ये सॅलरी अकाउंट म्हणजे पगार खाते असते. पगार खात्याच्या बाबतीत बघितले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात व प्रत्येक बँकेच्या माध्यमातून हे नियम पगार खात्यासाठी लागू होत असतात.

अगदी याच प्रमाणे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दृष्टिकोनातून बघितले तर ही बँक ग्राहकांना अनेक सुविधा देण्यामध्ये अग्रेसर असल्याचे आपल्याला दिसून येते. नोकरदार व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सॅलरी अकाउंट असते

व अशाप्रकारे एसबीआयमध्ये जर सॅलरी अकाउंट असेल तर बँकेच्या माध्यमातून उत्तम अशा अनेक सेवा मोफत दिल्या जातात. परंतु बऱ्याच नोकरदारांना याबाबतीत पुरेशी माहिती नसते. त्यातल्या त्यात संरक्षण दलातील कर्मचारी तसेच केंद्र व राज्य सरकार व पोलीस दल इत्यादी मधील कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा बँकेच्या माध्यमातून दिल्या जातात.

एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असल्यावर मिळतात हे फायदे

1- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शून्य शिल्लक ठेवून सॅलरी अकाउंट उघडले जाते.

2- इतकेच नाही तर सॅलरी अकाउंट होल्डर्स म्हणजेच खातेधारकांना मोफत वैयक्तिक अपघात विमा मिळतो व ज्यामध्ये 40 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध आहे.

3- तसेच पगार खातेधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक कोटी रुपयांच्या मोफत हवाई अपघात विम्याचा लाभ देखील दिला जातो. दुर्दैवाने एखाद्या ग्राहकाचा म्हणजेच खातेधारकाचा एखादा विमान अपघात म्हणजेच हवाई अपघात झाला तर यामध्ये त्याचा मृत्यू झालास संबंधित खातेधारकाच्या कायदेशीर वारसांना 1 कोटी रुपयांचा लाभ दिला जातो.

4- तसेच कार लोन, पर्सनल लोन व होम लोन वर अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

5- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर सॅलरी अकाउंट असेल तर अशा खातेधारकांना लॉकर भाड्यावर प्रत्येक वर्षी सुमारे 50 टक्के सूट मिळते.

6- बँकेच्या योनो ॲप आणि डेबिट कार्ड वर देखील उपलब्ध असलेल्या अनेक ऑफरचा लाभ घेता येतो.

7- तसेच या खातेधारकांना डिमॅट आणि ऑनलाइन ट्रेडिंगचे फायदे मिळतात.

8- याशिवाय ग्राहकांना मल्टिसिटी चेक, ड्राफ्ट, एसएमएस अलर्ट इत्यादी सुविधा देखील मोफत दिल्या जातात.

एसबीआय सॅलरी अकाउंट सेविंग अकाउंटमध्ये कधी रुपांतरीत होते?
समजा ग्राहकाचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सॅलरी अकाउंट म्हणजेच पगार खाते आहे व अशा ग्राहकांच्या खात्यामध्ये जर सलग तीन महिने पगार जमा झाला नाही तर ते खाते पगार खात्यातून बचत खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाते व तेव्हा मात्र पगार खात्यावर उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा देखील बदलतात बचत खात्याला जे काही नियम लागू होतात त्यांचे पालन करणे गरजेचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe