‘या’ ठिकाणी कराल एफडीत गुंतवणूक तर मिळेल बक्कळ परतावा !

देशातील मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांच्या ऐवजी प्रसिद्ध अशा स्मॉल फायनान्स बँक देखील ग्राहकांना केलेल्या एफडी वर खूप चांगल्या प्रकारे व्याज देतात व बंपर परतावा देखील देतात. देशातील या स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना मुदत ठेवीवर 9.60% पर्यंत व्याज देत आहेत.

Ajay Patil
Updated:
fd scheme

गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर बँकांच्या मुदत ठेव योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. कारण बँकांमधील मुदत ठेव योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते. परंतु त्या माध्यमातून मिळणारा परतावा देखील उत्तम पद्धतीचा मिळतो व त्यासोबत परताव्याची हमी देखील असते.

बँकेसोबतच पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना देखील खूप चांगल्या पद्धतीच्या असून या माध्यमातून देखील ग्राहकांना मुदत ठेवींवर खूप चांगल्या प्रकारे परतावा दिला जातो व गुंतवणूक देखील सुरक्षित राहते.

या व्यतिरिक्त जर तिसरा पर्याय म्हणून बघितले तर देशातील मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांच्या ऐवजी प्रसिद्ध अशा स्मॉल फायनान्स बँक देखील ग्राहकांना केलेल्या एफडी वर खूप चांगल्या प्रकारे व्याज देतात व बंपर परतावा देखील देतात. देशातील या स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना मुदत ठेवीवर 9.60% पर्यंत व्याज देत आहेत. या स्मॉल फायनान्स बँकांची माहिती आपण घेऊ.

 या ठिकाणी एफडीवर मिळते बंपर व्याज

1- युनिटी स्मॉल फायनान्स बँक या देशातील महत्त्वाची स्मॉल फायनान्स बँक असून या बँकेच्या माध्यमातून सर्वसाधारण ग्राहकांना 1001 दिवसांकरिता केलेल्या एफडी वर साधारणपणे नऊ टक्के व्याज देते आणि जेष्ठ नागरिकांना 9.50% इतके व्याज देत आहे.

2- फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ही देखील देशातील एक महत्त्वाची स्मॉल फायनान्स बँक असून ही बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना 1000 दिवसाच्या मुदत ठेवीवर साधारणपणे 8.51% व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 9.11% व्याज देत आहे.

3- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य ग्राहकांना पाच वर्षाच्या मुदत ठेवीवर 9.10% इतके व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 9.60% व्याज देत आहे.

4- जन स्मॉल फायनान्स बँक स्मॉल फायनान्स बँकेच्या सर्वसाधारण ग्राहकांनी जर पाचशे दिवसांकरता मुदत ठेव केली तर त्यावर ८.५०% तर ज्येष्ठ नागरिकांना 9% व्याज देत आहे.

5- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही स्मॉल फायनान्स बँक 1000 ते 1500 दिवसाच्या मुदत ठेवीवर सर्वसाधारण ग्राहकांना 8.25 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 8.85% व्याज देत आहे.

6- उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ही स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांनी जर 560 दिवसांची मुदत ठेव केली तर त्यावर 8.25 टक्के व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 8.85 टक्के व्याज देत आहे.

7- इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना 888 दिवसांच्या मुदत ठेवीवर 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना नऊ टक्के इतके व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe