एक वर्षात पैसे डबल ! ह्या शेअरवर पैसे लावले तर होईल मोठा फायदा…

प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म नुवामाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या फर्मने मजबूत फंडामेंटल असलेल्या काही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्या मते गुंतवणूकदारांना पुढील एका वर्षामध्ये या माध्यमातून 22 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

Ajay Patil
Updated:

आपल्याला माहित आहे की शेअर मार्केटमध्ये कायम चढ उतार होत असतात व शेअर मार्केटवर जागतिक आणि देशात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा किंवा घडामोडीचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे शेअर बाजारामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ती प्रामुख्याने दीर्घकालीन कालावधीसाठी करणे फायद्याचे ठरते व दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो.

यामध्ये जर चांगला अभ्यास किंवा तज्ञांच्या सल्ल्याने बाजाराची चढउताराची स्थिती लक्षात घेऊन जर शेअर्स खरेदी केले तर चांगला नफा मिळण्याची संधी या माध्यमातून मिळते.

याच पार्श्वभूमीवर जर आपण प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म नुवामाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या फर्मने मजबूत फंडामेंटल असलेल्या काही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्या मते गुंतवणूकदारांना पुढील एका वर्षामध्ये या माध्यमातून 22 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

एक वर्षाच्या गुंतवणुकीत हे शेअर्स देतील दमदार परतावा

1- अपोलो टायर्स नुवामा ब्रोकरेज फर्मने  अपोलो टायर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून याकरिता त्यांनी प्रति शेअर्स टार्गेट प्राईज 585 रुपये दिली आहे. जर आपण 9 ऑगस्ट 2024 रोजी या शेअरची किंमत पाहिली तर ती 497 रुपयांवर बंद झाली होती. म्हणजे सध्याची किमतीपेक्षा सुमारे टारगेट प्राईज पहिली तर गुंतवणूकदारांना 18 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

2- पिडिलाइट नुवामाच्या माध्यमातून पिडिलाइटवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून याकरिता प्रति शेयर्स टारगेट प्राईज तीन हजार सहाशे नव्वद रुपये इतके आहे.

जर नऊ ऑगस्ट रोजी या शेअरची किंमत पाहिली तर ती 3132 इतकी होती. म्हणजे सध्याच्या किमतीपेक्षा टार्गेट प्राईज नुसार गुंतवणूकदारांना 18% परतावा मिळू शकतो.

3- मिंडा कॉर्पोरेशननुवामाने मिंडा कार्पोरेशनवर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून याकरिता प्रति शेअर्स टारगेट प्राईज 585 रुपये आहे व नऊ ऑगस्ट 2024 रोजी शेअरची किंमत 512 रुपये होती व त्यावर तो बंद झाला होता. अशाप्रकारे गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा टार्गेट प्राईज नुसार 14 टक्के परतावा मिळू शकतो.

4- गुजरात गॅस तसेच नुवामाच्या माध्यमातून गुजरात गॅसवर देखील शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून याकरिता प्रति शेअर्स टारगेट प्राईज 745 रुपये इतकी आहे. नऊ ऑगस्टला हा शेअर्स 608 वर  बंद झाला होता. टारगेट प्राईस नुसार बघितले तर गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा या माध्यमातून 22%  परतावा मिळू शकतो.

(टीप वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे. या माध्यमातून आम्ही कुणालाही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe