Post Office FD Scheme:- ज्याप्रमाणे बँकांच्या अनेक मुदत ठेव योजना आहेत त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील मुदत ठेव म्हणजेच एफडी स्कीम राबवल्या जातात. सध्या पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये ग्राहकांना चांगला व्याजदर दिला जात आहे.
ज्याप्रमाणे बँकांच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते अगदी त्याचप्रमाणे आता पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनांमध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.
पोस्ट ऑफिस मध्ये जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकतात व त्यामध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.
पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये किती मिळते व्याज?
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीमध्ये वेगवेगळे व्याजदर असतात व ते योजनेचे कालावधीनुसार ठरवले जातात. तुम्ही यामध्ये एक वर्ष ते पाच वर्षाच्या कालावधी करिता पैसे गुंतवणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला कालावधीनुसार व्याजदर दिला जातो.
सध्या पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनांमध्ये एका वर्षाकरिता 6.9% दराने व्याज मिळते व दोन वर्षाच्या कालावधी करिता गुंतवणूक केली तर पोस्ट ऑफिस तुम्हाला सात टक्क्यांपर्यंत व्याज देते. तसेच तुम्ही जर तीन वर्ष कालावधी करिता पैसे गुंतवले तर तुम्हाला 7.10% इतका व्याजदर मिळतो.
त्याशिवाय पाच वर्षाच्या कालावधी करिता पैसे गुंतवले तर जास्तीत जास्त व्याजदराचा लाभ मिळतो. साधारणपणे पाच वर्षाच्या कालावधी करिता 7.50% व्याजदराचा फायदा देण्यात येतो.
तीन वर्षाकरिता पोस्ट ऑफिसमध्ये एक लाख रुपयांची एफडी केली तर किती पैसे मिळतात?
जर तुम्ही एक लाख रुपये पोस्ट ऑफिस मुदत ठेव म्हणजेच एफडी स्कीममध्ये तीन वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 7.10 टक्के दराने व्याज देण्यात येईल. या व्याजदरासह पोस्ट ऑफिस तीन वर्षानंतर तेवीस हजार पाचशे आठ रुपये व्याज देते.
म्हणजेच तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एक लाख 23 हजार पाचशे आठ रुपयाची मॅच्युरिटी रक्कम म्हणजेच परतावा मिळतो. यामध्ये गुंतवलेली रक्कम आणि तीन वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळालेले व्याज यांचा समावेश असतो.
महत्वाचे
तुम्हाला जर पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये तुम्हाला एक लाख रुपये किंवा कितीही रक्कम गुंतवायची असेल तर तुम्हाला ते पैसे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडताना एकरकमी जमा करावे लागतात
आणि ते निवडल्या खात्यामध्ये असतात. गुंतवणुकीचा जो काही कालावधी असेल त्यानंतर पोस्ट ऑफिस कडून ते पैसे तुम्हाला परत केले जातात.