Cheapest Home Loan : प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते. पण महागाईच्या या जमान्यात घर घेणे तेवढे सोपे नाही. पण अशा काही बँका आहेत, ज्या घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. होय, आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, ज्या स्वस्त दरात गृहकर्ज ऑफर करत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया…
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया गृह कर्ज सध्या सर्वात स्वस्त दरात देत आहे. बँकेचे व्याज दर वार्षिक 8.30 टक्के पासून सुरू होतात. बँक 30 वर्षांपर्यंत मालमत्ता मूल्याच्या 90 टक्के पर्यंत कर्जाची रक्कम प्रदान करते. बँक गृहकर्ज घेणाऱ्यांना ओव्हरड्राफ्ट आणि होम लोन बॅलन्स ट्रान्सफर सुविधाही पुरवत आहे.
एचडीएफसी बँक
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी गृह कर्जाच्या बाबतीत तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या HDFC बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर 30 लाख ते 75 लाख रुपये 8.35 टक्क्यांपासून सुरू होतात.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा सध्या पगारदार आणि पगार नसलेल्या लोकांकडून समान व्याज आकारत आहे. ही बँक गृहकर्जावर 8.40 टक्के ते 10.60 टक्के वार्षिक व्याज आकारत आहे. लक्षात घ्या व्याजदरातील बदल कर्ज मर्यादा आणि CIBIL स्कोअरवर आधारित आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया देखील यावेळी स्वस्त गृह कर्ज ऑफर करत आहे. बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक 8.40 टक्क्यांपासून सुरू होतात. तुम्ही बँकेकडून 30 वर्षांपर्यंत कर्ज घेऊ शकता. SBI कर्ज घेण्यावर महिलांना 0.05 टक्के व्याज सवलत देखील देते.
पंजाब नॅशनल बँक
स्वस्त कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत पंजाब नॅशनल बँकेचाही समावेश आहे. PNB 8.45 टक्के ते 10.25 टक्के वार्षिक व्याज दराने 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. उच्च CIBIL स्कोअर असलेल्यांना आणखी कमी दरात कर्ज मिळेल.