5 वर्षाच्या एफडीतून मिळवायचा भरपूर पैसा तर ‘या’ बँकांमध्ये करा एफडी! जाणून घ्या व्याजदर

जोखीममुक्त आणि उत्तम परतावा मिळवायचा असेल तर मुदत ठेव योजना या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आपल्याला माहित आहे की कुठल्याही बँकेच्या माध्यमातून तुम्ही एफडी केली तर तुमचे पैसे बुडण्याचा धोका नसतो आणि तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो. देशातील प्रत्येक बँकांमध्ये आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात व प्रत्येक बँकेचे व्याजदर देखील वेगवेगळे आहेत.

Ajay Patil
Published:

FD Interest Rate:- जोखीममुक्त आणि उत्तम परतावा मिळवायचा असेल तर मुदत ठेव योजना या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आपल्याला माहित आहे की कुठल्याही बँकेच्या माध्यमातून तुम्ही एफडी केली तर तुमचे पैसे बुडण्याचा धोका नसतो आणि तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो. देशातील प्रत्येक बँकांमध्ये आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात व प्रत्येक बँकेचे व्याजदर देखील वेगवेगळे आहेत.

यामध्ये तुम्ही किती कालावधी करिता एफडी करत आहात यावर व्याजदर अवलंबून असतो. इतकेच नाही तर बँकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदराचा लाभ दिला जातो हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला जर फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर वेगवेगळ्या बँकांचा व्याजदर किती आहे? याचा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.

कारण एका बँकेच्या व्याजदरापेक्षा दुसऱ्या बँकेचा व्याजदर 0.50% जरी जास्त असेल तरी परताव्यात खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे एफडी करताना व्याजदरांची तुलना करून मगच निवड करणे गरजेचे ठरते.

कारण व्याजदरातील थोडासा फरक तुमचे पैसे वाढवायला तुम्हाला खूप मोठी मदत करत असतो. त्यामुळे या लेखात आपण तुम्हाला जर पाच वर्ष कालावधीकरिता एफडी करायची असेल तर कुठली बँक किती व्याज देत आहे? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

पाच वर्षे कालावधी करिता कोणती बँक किती देत आहे व्याजदर?

1- एचडीएफसी बँक- एचडीएफसी बँक पाच वर्षाच्या मुदत ठेवीवर सात टक्के व्याजदर देत आहे व त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के इतके व्याज देत आहे.

2- आयसीआयसीआय बँक- आयसीआयसीआय बँक ही देशातील एक महत्त्वाची बँक असून आयसीआयसीआय बँकेत जर पाच वर्ष कालावधी करिता एफडी केली तर ही बँक देखील सात टक्के इतके व्याज देत आहे व ज्येष्ठ नागरिकांना 7.5% इतका व्याजदर देत आहे.

3- ॲक्सिस बँक- ॲक्सिस बँकेमध्ये जर तुम्ही पाच वर्षे कालावधी करिता एफडी केली तर सामान्य नागरिकांना सात टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.

4- येस बँक- बँकेत जर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर सामान्य नागरिकांकरिता 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8% इतका व्याज देत आहे.

5- स्टेट बँक ऑफ इंडिया- स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेत जर तुम्ही पाच वर्षांच्या कालावधी करिता एफडी केली तर सामान्य नागरिकांना 6.5% तर जेष्ठ नागरिकांना 7.5 टक्के इतके व्याज देत आहे.

6- पंजाब नॅशनल बँक- या बँकेने एक जानेवारी 2025 पासून पाच वर्षाच्या एफडीवर सामान्य नागरिकांकरिता 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना सात टक्के इतका व्याजदर ऑफर केला आहे.

7- बँक ऑफ बडोदा-ही बँक सामान्य नागरिकांना 6.8% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.4% इतके व्याज देत आहे.बँक ऑफ बडोदा ने हे व्याजदर 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe