नवीन वर्ष 2025 मध्ये शेअर बाजारातून कमवायचा चांगला नफा तर ‘हे’ शेअर्स ठरतील फायद्याचे! जाणून घ्या ब्रोकर्सने सुचवलेले शेअर्स

2024 या वर्षाला आपण अलविदा म्हटले आणि कालच नवीन वर्ष 2025 चे उत्साहाने सगळ्यांनी स्वागत केले. जर आपण 2024 या वर्षाचा मागोवा घेतला तर शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून हे वर्ष काहीसे उलथापालथीचे ठरले. बऱ्याचदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन गुंतवणूकदारांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्ट्या नुकसान झाले.

Ajay Patil
Published:
share market

Shares Market Update:- 2024 या वर्षाला आपण अलविदा म्हटले आणि कालच नवीन वर्ष 2025 चे उत्साहाने सगळ्यांनी स्वागत केले. जर आपण 2024 या वर्षाचा मागोवा घेतला तर शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून हे वर्ष काहीसे उलथापालथीचे ठरले. बऱ्याचदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन गुंतवणूकदारांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्ट्या नुकसान झाले.

साधारणपणे संमिश्र परिस्थिती आपल्याला 2024 मध्ये दिसून आली. मात्र काल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारामध्ये चांगल्यापैकी तेजी दिसून आली.

आता जर आपण बघितले तर वर्ष 2025 मध्ये शेअर बाजाराची स्थिती कशी राहील किंवा कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.

या अनुषंगाने जर आपण बघितले तर देशातील काही आघाडीच्या आणि प्रसिद्ध असलेल्या ब्रोकर्सच्या माध्यमातून काही शेअर्सची शिफारस करण्यात आली आहे. जे शेअर्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतात.

एचडीएफसी सिक्युरिटीजने सुचवलेले शेअर्स

1- हिंदुस्तान युनिलिव्हर- सध्या जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरची किंमत बघितली तर ती 2327 रुपयाच्या आसपास आहे. या शेअर्ससाठी लक्ष किंमत ही तीन हजार दोनशे रुपये देण्यात आली आहे.

2- महानगर गॅस- या शेअर्सची सध्याची किंमत 1282 इतके आहे व या शेअर्स करिता टारगेट प्राईज म्हणजेच लक्ष किंमत सोळाशे रुपये इतकी देण्यात आली आहे.

कोटक सिक्युरिटीजने सुचवलेले शेअर्स

1- इन्फोसिस- सध्या इन्फोसिसच्या शेअरची किंमत 1885 रुपये असून या शेअर्स साठी टारगेट प्राईज 2250 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

2- जिंदाल स्टील अँड पॉवर- जिंदाल स्टील अँड पावरच्या शेअर्सची सध्याची किंमत 930 रुपये असून त्याकरिता लक्ष्य किंमत 1150 रुपये इतकी देण्यात आली आहे.

3- एजिस लॉजिस्टिक्स- सध्याची किंमत जर बघितली तर 822 रुपया असून याकरिता टारगेट प्राईज 950 देण्यात आली आहे.

ॲक्सिस सिक्युरिटीजने सुचवलेले शेअर्स

1- भारती एअरटेल- भारती एअरटेलच्या शेअर्सची सध्याची किंमत 1593 रुपये असून त्याकरिता टारगेट प्राईज १८८० रुपये देण्यात आली आहे.

2- फोट्रीस हेल्थकेअर- या शेअर्सची सध्याची किंमत ७२० रुपये असून त्याच्याकरता टार्गेट प्राईज 860 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

3- सिटी युनियन बँक- सिटी युनियन बँकेच्या शेअर्सची सध्याची किंमत 172 रुपये असून त्याकरिता टारगेट प्राईज दोनशे पंधरा रुपये देण्यात आली आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजने सुचवलेले शेअर्स

1- बजाज फायनान्स- बजाज फायनान्सच्या शेअर्सची सध्याची किंमत 6835 रुपये असून त्याकरिता टारगेट प्राईज आठ हजार दोनशे रुपये देण्यात आले आहे.

2- स्टार हेल्थ- स्टार हेल्थ च्या शेअर्सची सध्याची किंमत 474 रुपये असून याकरता टार्गेट प्राईस सातशे रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

3- सिएट- या शेअर्सची सध्याची किंमत 3253 रुपये असून त्याकरिता टारगेट प्राईज 4000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले शेअर्स

1- एचसीएल टेक्नॉलॉजीज- या शेअर्सची सध्याची किंमत 1924 रुपये असून त्याकरिता टारगेट प्राईज 2300 रुपये आहे.

2- इंडियन हॉटेल्स- या शेअर्सची सध्याची किंमत आहे 874 रुपये असून त्याकरिता टारगेट प्राईज 950 रुपये इतकी देण्यात आली आहे.

3- एंजेल वन- या शेअर्सची सध्याची किंमत 2934 रुपये असून त्याकरिता टारगेट प्राईज 4200 इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe